घरदेश-विदेशशेतकरी आंदोलनाच्या स्थळावर तरुणाची वार करून निर्घृण हत्या

शेतकरी आंदोलनाच्या स्थळावर तरुणाची वार करून निर्घृण हत्या

Subscribe

दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्याने खळबळ उडालीय. हत्यार्‍यांनी या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला. या व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार झालेले दिसत आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलाय.

या घटनेविषयी माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, सोनिपतमधील कुंडलीत शेतकरी आंदोलन सुरू आहे तेथे आज (१५ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता हात बांधून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला. याला कोण जबाबदार आहे याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती हंसराज यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, ४० शेतकरी संघटना एकत्र येऊन तयार झालेल्या संयुक्त किसान मोर्चाने या हत्येमागे निहंगा असल्याचा आरोप केलाय. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी सांगितले. या हत्येमागे निहंगा आहेत. त्यांनी हे मान्य केलंय. निहंगा सुरुवातीपासून आम्हाला अडचणीत आणत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने या घटनेशी आपला संबंध नसल्याचे म्हटलेय. तसेच या हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी दाखवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -