घरताज्या घडामोडीहैदराबादमध्ये लाडक्या बाप्पाच्या प्रसादाचा लाडू मिळवण्यासाठी 45 लाखांची बोली

हैदराबादमध्ये लाडक्या बाप्पाच्या प्रसादाचा लाडू मिळवण्यासाठी 45 लाखांची बोली

Subscribe

मराकाठा श्री लक्ष्मी गणपती उत्सव मंडळाच्या लाडूचा 44,99,999 रूपयामध्ये लिलाव झाला. ही बोली फक्त हैदराबाद आणि सिकंगराबादमधीलच नाही तर तेलुगू राज्यांमधील देखील एका लाडूसाठी केलेली सर्वाधिक बोली ठरत आहे.

हैदराबादच्या एका गणेश मंडळामध्ये शनिवारी झालेल्या लिलावामध्ये गणपती बाप्पाला गणेशोत्सवादरम्यान अर्पण केलेल्या लाडूचा 45 लाख रूपयांमध्ये लिलाव झाला आहे. 12 किलो लाडूचा लिलाव प्रसिद्ध बालापूर गणेश लाडूपासून जवळपास दुप्पट किमतीमध्ये झाला आहे. या लाडूची किंमत पूर्वी 24.60 लाख होती.

मराकाठा श्री लक्ष्मी गणपती उत्सव मंडळाच्या लाडूचा 44,99,999 रूपयामध्ये लिलाव झाला. ही बोली फक्त हैदराबाद आणि सिकंगराबादमधीलच नाही तर तेलुगू राज्यांमधील देखील एका लाडूसाठी केलेली सर्वाधिक बोली ठरत आहे.

- Advertisement -

खरंतर, या भागात गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवण्यात आलेल्या प्रसादाची बोली करण्याची प्रथा आहे. या ठिकाणी अशी मान्यता आहे की, जो व्यक्ती हा प्रसाद जिंकतो त्याला गणपती बाप्पाचा विशेष आर्शीवाद प्राप्त होतो. स्थानिक लोकांच्या मते हा लाडू त्यांच्यासाठी सौभाग्य, धन आणि समृद्धी घेऊन येतो.

बालापूरच्या या लाडूला एका स्थानीक शेतकरी लक्ष्मा रेड्डीने 24.60 रूपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच आता कानाजीगुडा मरकाटाच्या श्री लक्ष्मी गणपती लाडूला आता गीताप्रिया आणि व्यंकट राव यांनी 44,99,999 रूपयांमध्ये खरेदी केलं आहे.

- Advertisement -

या समिताचे सदस्य लक्ष्मा रेड्डी यांनी सांगितलं की, लिलावातील पैश्यांचा वापर ते बालापूरमधील मंदिरांचा विकास करण्यासाठी करतात. लाडूचा लिलाव 1994 पासून सुरू आहे. पहिल्यांदा एका शेतकऱ्याने 450 रूपयांमध्ये लाडूची बोली लावली होती.

 


हेही वाचा :hyderabad,ganesh pooja,laddo auction

डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिर तयार, उभारणीसाठी लागणार 1800 कोटींचा खर्च

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -