घरदेश-विदेशआज संध्याकाळी आकाशात सरळ रेषेत दिसणार 5 ग्रह; या संयोगाचा बसू शकतो...

आज संध्याकाळी आकाशात सरळ रेषेत दिसणार 5 ग्रह; या संयोगाचा बसू शकतो शेतकऱ्यांना फटका

Subscribe

खगोल शास्त्रज्ञांच्या मते, आज म्हणजेच 28 मार्च रोजी आकाशात एक अद्भुत दृश्य दिसणार आहे. आज संध्याकाळी जवळपास 07:30 च्या सुमारास बुध, गुरू, शुक्र, युरेनस आणि मंगळ हे पाच ग्रह एका सरळ रेषेत दिसतील. हे अद्भूत दृश्य तुम्ही दुर्बिणीशिवाय देखील पाहू शकता. सूर्यास्तानंतर या पाच ग्रहांचा हा अद्भूत संयोग पश्चिमीकडे दिसेल.

ग्रहांचे हा संयोग कसा पाहाल?

Planetary Parade 2023: आज आसमान में बन रहा है अत्यंत दुर्लभ संयोग, इन लोगों पर पड़ेगा असर।

- Advertisement -

खगोल शास्त्रज्ञांच्या मते, हा संयोग संध्याकाळी 06.36 ते 07.30 दरम्यान दिसू शकतो. मात्र, सूर्यास्तानंतर अर्ध्या तासात बुध आणि गुरू पश्चिमेला अस्त होतील. तसेच गुरू, शुक्र आणि मंगळाची चमक अधिक असल्याने ते तुमच्या डोळ्यांनाही एका रेषेत दिसू शकतात. मात्र, तुम्हाला बुध आणि वरुण म्हणजेच युरेनस पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल.

ग्रहांच्या संयोगामुळे शेतकऱ्यांना बसणार फटका

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतात आणि ठराविक काळासाठी त्या राशीत स्थिर राहतात. सध्या शनि कुंभ राशीत बसला असून गुरू आणि बुध मीन राशीत संयोग बनवत आहेत. या राशीत सूर्य आधीपासूनच आहे.

- Advertisement -

खगोल शास्त्रज्ञांच्या मते, या संयोगामुळे आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य आणि उत्तर भारतातील मुख्य भागात जास्त पाऊस पडू शकतो, सोबतच गारपीटही होऊ शकते. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान पिकांचे होऊ शकते, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

 


हेही वाचा :

सावरकरांशी लढायचे की मोदींशी हे ठरवा, गोंधळ नको; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -