घरCORONA UPDATEचिंता वाढली! देशात एका दिवसांत ७०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

चिंता वाढली! देशात एका दिवसांत ७०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Subscribe

देशात गेल्या २४ तासांत ५५ हजार ८३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७७ लाख ०६ हजार ९४६ इतकी झाली आहे. त्यातील ७ लाख १५ हजार ८१२ अॅक्टिव्ह केसेस असून काल त्यात २४ हजार २७८ नव्या रुग्णांची नोंद त्यात झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख १६ हजार ६१६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६८ लाख ७४ हजार ५१८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली असून गेल्या २४ तासांत त्यापैकी ७९ हजार ४१५ जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत ९ कोटी ८६ लाख ७० हजार ३६३ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. यातील १४ लाख ६९ हजार ९८४ जणांच्या चाचण्या काल करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख १७ हजार ६५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

हेही वाचा –

मोदींनी सुरू केली दीर्घ तपस्येची पूर्वतयारी; शिवसेनेचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -