घरताज्या घडामोडीCoronaVirus: मध्य प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्याची कोरोनाशी झुंज अयशस्वी!

CoronaVirus: मध्य प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्याची कोरोनाशी झुंज अयशस्वी!

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि इतर कर्मचारी जीवाची पर्वा न करताना अहोरात्र काम करत आहेत. या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या अनेक रिअल हिरोनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान मध्यप्रदेशमधील आणखीन एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. इंदौर येथील रुग्णालयात उपचार दरम्यान ५९ वर्षीय पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यशवंत पाल यांचे निधन झाले आहे. ते उज्जैन जिल्ह्यातील नीलगंगा क्षेत्राचे प्रभारी अधिकारी होते.

त्यांच्या पोलिस स्टेशन परिसरातील अंबर कॉलनी येथील २७ मार्चला संतोष वर्मा नावाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते स्वतः सभोवतालच्या परिसरातील व्यवस्थेकडे पाहत होते. पण ते कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले आणि त्यांना प्रकृती बिघडली.

- Advertisement -

इंदौर मधील अरविंदो रुग्णालयाचे अधिकारी डॉ. विनोद भंडारीच्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी यशवंत पाल यांचे मंगळवारी सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. गेल्या १० दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यावेळी त्याच्या दोन्ही फुफ्फुसात न्यूमोनिया झाला होता त्यामुळे त्यांना श्वास घेताना खूप त्रास होत होता. त्यांचे ऑक्सिजन प्रमाणही ६० टक्के होते. सतत उपचार करूनही त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना ४८ तास व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले. सर्व प्रयत्न करू त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही.

ते पुढे म्हणाले की, गेल्या १२ दिवसांपासून यशवंत पाल रुग्णालयात दाखल होते. त्यांची रुग्णालयात दाखल झाल्यापासून प्रकृती चिंताजनक होती. त्याचा अहवाला देखील कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

- Advertisement -

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाच्या युद्धात यशवंत पाल यांचा मृत्यू झाल्यामुळे दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट केलं की, दुःखाच्या या काळात दिवंगत यशवंत पाल यांच्या कुटुंबियासोबत मी आणि पूर्ण मध्य प्रदेश उभा आहे. राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबाला ५० लाखाचे सुरक्षा कवच, पेंशन, मुलीला उपनिरीक्षक पदावर नियुक्ती आणि स्वर्गीय पाल यांना मरणोत्तर कर्मवीर पदक सन्मानित केले जाईल.


हेही वाचा – म्हणे, ‘जळून राख होऊन जाईल उद्धव ठाकरेंचं सरकार’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -