घरदेश-विदेशदारूच्या उधारीसाठी बापाने सात वर्षीय मुलाला विकले

दारूच्या उधारीसाठी बापाने सात वर्षीय मुलाला विकले

Subscribe

तामिळनाडूतील घटना, बाल कल्याण विभागाने केली कारवाई

दारुची उधारी चुकवण्यासाठी स्वतःच्या सात वर्षाच्या मुलाला विकण्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडू राज्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. तसेच मागील सहा महिन्यांपासून या मुलाला जबरदस्तीने कामाला लावले जात होते. बाल कल्याण विभागाला याबाबत माहिती मिळताच पीडित मुलाची सुटका करण्यात आली.

पीडित मुलगा तमीळनाडू राज्यातील कृष्णागिरी खेडेगावात शेळी पालनाचे काम करत होता. या मुलाचे मुळगाव धर्मापूर्वी जिल्ह्यात असून त्याच शेजारील जिल्ह्यात तो काम करत होता. ५० शेळ्यांच्या पालनाची जबाबदारी पीडित मुलाला देण्यात आली होती. दारुचे व्यसन असल्याने वडिल त्याचा सांभाळ करत नव्हते. आई हयात नसल्याने मुलावर लक्ष ठेवणारे कोणीच नव्हते. दारु पिऊन आल्यानंतर मुलाला वडिलांकडून मारहाण करण्यात येत होती. दारुच्या व्यसनामुळे वडिलाला कुठेही काम मिळत नव्हते. घरची परिस्थीती बेताची असल्याने त्याने उधारीवर दारु पिण्यास सुरुवात केली. दारु साठी वडिलाने वीस हजारांची उधारी केली. मात्र पैसे नसल्यामुळे त्याने आपल्या सात वर्षीय मुलाला विकले. इच्छा नसतानाही बळजबरीने या मुलाकडून शेळी पालन करण्यात येत होते. याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर एका स्थानिक एनजीओने बाल कल्याण विभागाची मदत घेऊन या मुलाची सुटका केली.

- Advertisement -

“तक्रार मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही मुलाला आमच्या ताब्यात घेतले. मुलगा विकत घेणाऱ्यावर बाल कामगार कलमा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामुलाच्या इतर नातेवाईकांचा शोध आम्ही घेत आहोत. पीडित मुलाला शिक्षण देण्यासाठी शाळेत टाकले जाणार आहे.” बाल श्रम विभागाच्या प्रमुख एस. प्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -