घरCORONA UPDATELockdown: २१ दिवसांत ८ लाख कोटींचं नुकसान

Lockdown: २१ दिवसांत ८ लाख कोटींचं नुकसान

Subscribe

एक्यूट रेटिंग्ज आणि रिसर्च लिमिटेड या रेटिंग एजन्सीने यापूर्वी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दररोज सुमारे ३५,००० कोटी रुपयांचा तोटा होईल असा अंदाज वर्तविला होता.

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, लॉकडाउनचा पहिला टप्पा आज म्हणजेच १४ एप्रिल रोजी संपत आहे. पीएम मोदींनी आज लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनने भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे.

अर्थव्यवस्थेला मोठा धक्का

विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवस देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्या दिवशी मध्यरात्रीपासून म्हणजेच २५ मार्च पासून लॉकडाऊनचा कार्यकाळ सुरु झाला, ज्याचा कालावधी मंगळवारी म्हणजे १४ एप्रिल रोजी संपणार आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात मोठ्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ७-८ लाख कोटी रुपयांचा झटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या लॉकडाऊन दरम्यान बहुतेक कंपन्या, उद्योग बंद पडले, उड्डाण सेवा बंद करण्यात आल्या. या लॉकडाऊनमुळे भारताची ७० टक्के आर्थिक कामं थांबली. लॉकडाऊन दरम्यान, केवळ आवश्यक वस्तू आणि शेती, खाणकाम, उपयोगिता सेवा आणि काही आर्थिक आणि आयटी सेवा चालवण्यास परवानगी होती. भारतीय अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे आणि अशा परिस्थितीत कोरोना साथीने पूर्णपणे अर्थव्यवस्था कोसळली आहे. यामुळे, सर्व देशी आणि परदेशी रेटिंग एजन्सींनी जीडीपी वाढीचा अंदाज या आर्थिक वर्षात १.५ ते २.५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

दररोज ३५ हजार कोटींचे नुकसान

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, एक्यूट रेटिंग्ज आणि रिसर्च लिमिटेड या रेटिंग एजन्सीने यापूर्वी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दररोज सुमारे ३५,००० कोटी रुपयांचा तोटा होईल असा अंदाज वर्तविला होता. २१ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत जीडीपीचे ७ ते ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं. या अहवालात असं म्हटलं आहे की, देशात संपूर्ण लॉकडाऊनमुळे सात ते आठ लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -