Lockdown : लॉकडाऊनमुळे लग्न सोहळे रद्द

लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्याबरोबर मे महिन्यापर्यंतचे लग्न सोहळे रद्द होऊ लागले आहेत. यंदा लग्नाचे मुहूर्त कमी आहेत.

कोरोना व्हायरसचा परिणाम हा लग्न सोहळ्यावर पडू लागला आहे. १५ एप्रिलपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होत आहे. आणि या महिन्यात एकूण पाच मुहूर्त आहेत. पण लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्याबरोबर मे महिन्यापर्यंतचे लग्न सोहळे रद्द होऊ लागले आहेत. यंदा लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. याशिवाय एप्रिल ते मे महिन्यात १२ मुहूर्त आहेत. परंतु कडक लॉक डाऊन आणि सोशल डिस्टसिंगमुळे लोक मे महिन्याबद्दल ही साशंक आहे. त्यामुळे जून महिन्यात लोकांची घाई असेल. मात्र जून महिन्यात केवळ ३ मुहूर्त आहेत. त्यानंतर पुढच्यावर्षी मार्चपर्यंत ६ शुभ तिथी आहेत.

जुलै ते २४ नोव्हेंबरपर्यंत कोणतेच मुहूर्त नाही

२०२० विवाह मुहूर्त
एप्रिल – १५, २०, २५, २६, २७
मे – १, २, ४, ६, १७, १८, १९
जून – १३, १५, ३० तारीख

१ जुलै ते २४ नोव्हेंबरपर्यंत शुभ मुहूर्त नाही

नोव्हेंबर – २५, ३०
डिसेंबर – ७, ९

२०२१ मध्ये जानेवारी व मार्चमध्ये मुहूर्त नाही

जानेवारी – कोणताच मुहूर्त नाही
फेब्रुवारी – १५, १६
मार्च – कोणताच मुहूर्त नाही

३.८० लाख कोटी रुपयांचा वार्षिक बाजार

भारतात लग्नाचा बाजार ३.८० लाख कोटी रुपयांचा आहे, जो दरवर्षी वेगाने वाढत आहे. १३० कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात दरवर्षी १-१.२ कोटी लग्न होतात.