घरदेश-विदेशसरकारी नोकर्‍यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

सरकारी नोकर्‍यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा (आप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार आगामी काळात दिल्लीतून शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सरकारी नोकर्‍यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. सध्याच्या घडीला दिल्लीतील सरकारी नोकर्‍यांमध्ये राज्याबाहेरून आलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्लीतून शिक्षण घेणार्‍यांना नोकर्‍यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाला वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचे म्हटले. भारताने आजपर्यंत अनेक हल्ले सहन केले. मात्र, आता भारताच्या एकतेवरच प्रहार केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही एकट्यादुकट्या पक्षाची राहिलेली नाही. मोदी-शहा यांनी सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती का होऊ शकली नाही, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. युतीची चर्चा ही ट्विटरवर होऊ शकते का? जर मोदी-शहा पुन्हा सत्तेत आले तर त्यासाठी केवळ गांधीच जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी केजरीवाल यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -