घरक्रीडाआशियाई बॉक्सिंग स्पर्धा

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

Subscribe

अमित पंघाल (५२ किलो) आणि कविंदर सिंग बिश्त (५६ किलो) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या दोघांनी यावर्षी आपले सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतालाही या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी आहे. शिवा थापाला (६० किलो) मात्र अंतिम फेरी गाठण्यात अपयश आल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. मात्र, असे असली तरी त्याने सलग चौथ्या वर्षी पदक मिळवत विक्रम केला आहे. अमित आणि कविंदरसोबतच दीपक सिंह (४९ किलो), आशिष कुमार (७५ किलो) यांनी पुरुषांमध्ये तर पूजा राणी (८१ किलो) आणि सिमरनजीत कौर (६४ किलो) यांनी महिलांमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

अमित पंघालने ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या हू जियानगुआनचा पराभव केला. दुसरीकडे कविंदर सिंग बिश्त ५६ किलो वजनी गटात मंगोलियाच्या एंख-अमर खाखूला ३-२ असे पराभूत केले. या सामन्यात दोन्ही बॉक्सरनी आक्रमक खेळ केला.

- Advertisement -

शिवा थापानेही ६० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीतील सामन्याची आक्रमक सुरुवात केली. मात्र, २०१५ च्या स्पर्धेत रौप्य मिळवणार्‍या झाकीर शफीउल्लीनविरुद्धच्या या सामन्यातील अखेरच्या फेरीत शिवाला चांगला खेळ करता आला नाही आणि त्याने हा सामना गमावला. तसेच आशिष (६९ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलो वरील) यांनाही कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. महिलांमध्ये सरिता देवी (६० किलो), मनिषा (५४ किलो), निखत झरीन (५१ किलो) आणि सोनिया चहल (५७ किलो) यांनाही कांस्यपदक पटकावण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -