घरदेश-विदेशयंदा सरासरीच्या ९४ टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज

यंदा सरासरीच्या ९४ टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज

Subscribe

यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरीच्या केवळ ९४ टक्केच पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार अल-निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत पावसाची सरासरी ८५८.६ मिमी राहण्याची शक्यता आहे. गुजरातसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत कमी पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांत हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान संस्थेने यावर्षी मान्सूनवर अल-निनोचा परिणाम होण्याचे भाकीत वर्तविले होते. आता स्कायमेटनेदेखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ होणार आहे, मात्र अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज आलेला नाही. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला वर्तवेल. त्यानंतरच पावसाची स्थिती नेमकी काय राहील याबाबत थोडा अंदाज येईल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी भारतीय हवामान विभाग पुन्हा अंदाज देईल. त्यानंतर यावर्षीच्या पावसाची स्थिती नेमकी काय राहील हे समजेल.

- Advertisement -

ट्रिपल-डिप-ला निनामुळे गेल्या सलग ४ वर्षांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहिले. आता ला निना संपला आहे आणि अल-निनोची शक्यता वाढत असून पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. अल-निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर अल-निनोचा थेट परिणाम होतो.
-जतिन सिंह, व्यवस्थापकीय संचालक, स्कायमेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -