घरदेश-विदेशहरियाणात रावण दहनावेळी लोकांवर पडला जळता पुतळा; सुदैवाने जीवितहानी नाही

हरियाणात रावण दहनावेळी लोकांवर पडला जळता पुतळा; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

लाकूड काढताना 70 फुटांचा पुतळा लोकांच्या अंगावर पडला आणि त्याखाली सात जण सापडले. लोकांच्या अंगावर पडलेला पुतळा पाहून हरियाणातील मैदानावर एकाच गोंधळ उडाला.

बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी देशभरात सर्वत्र दसऱ्याचा सण आनंदात आणि उठत पार पडला. दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटल्यानंतर सर्वत्र रावणाचे दहन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी हरियाणा राज्यात यमुना नगरमध्ये रावण दहनावेळी रावणाचा जळता पुतळा तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर पडलायची घटना घडली. या घटनेत काही जण जखमी झाले. मात्र मोठे कोणतेही नुकसान झाले नाही. रावणाच्या झालेल्या पुतळ्यातील लाकडे काढल्याने पुतळा [पडल्याची घटना घडली त्यामुळे जळत्या पुतळ्यातील लाकडे काढणे अंगावर बेतले.

लाकूड काढताना 70 फुटांचा पुतळा लोकांच्या अंगावर पडला आणि त्याखाली सात जण सापडले. लोकांच्या अंगावर पडलेला पुतळा पाहून हरियाणातील मैदानावर एकाच गोंधळ उडाला. दरम्यान दसऱ्या दिवशी या मैदानावर रावण दहन पाहण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात त्यामुळे खूप गर्दी होते या गर्दीचे नियोजन करण्यासाठी अनेक पोलीस सुद्धा तिथे तैनात असतात. दरम्यान या सगळ्या प्रकरणी लोकांना थांबविण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस या घटनेत थोडक्यात बचावले.

- Advertisement -

या सर्व घटनेत डोक्याला मार लागल्याने तीन जण जखमी झाले. तर दोघांचे कपडे सुद्धा जळाले. या सगळ्या परिस्थिती लोकांना नियंत्रित कारण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण जखमी झालेल्यांना मात्र लगेचच उपचारांसाठी हलविण्यात आले. पुतळा पडल्यावर परिसरात गोंधळाचे आणि चेंगराचेंगरीचे वार्तावर निर्माण झाले.

- Advertisement -

हे ही वाचा – पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -