घरदेश-विदेशहत्येच्या आरोपाखाली तरुण तुरुंगात, सात वर्षांनी कळलं मुलगी जिवंत; काय आहे प्रकरण...

हत्येच्या आरोपाखाली तरुण तुरुंगात, सात वर्षांनी कळलं मुलगी जिवंत; काय आहे प्रकरण वाचा!

Subscribe

या मुलीची आता डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे. ही मुलगी संबंधित कुटुंबाचीच असल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तिच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेल्या तरुणाला सोडण्यात येणार आहे.

अलिगढ – एका अल्पवयीन मुलीची सात वर्षांपूर्वी हत्या झाल्याप्रकरणी एका तरुणाला दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणात त्याला कोठडीही सुनावण्यात आली. गेल्या सात वर्षांपासून तो खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. परंतु, त्या मुलीची हत्या झालीच नसल्याची धक्कादायक माहिती आता सात वर्षांनी उजेडात आली आहे. त्यामुळे तिच्या खुनाप्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाच्या घरवापसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा हा प्रकार घडला आहे अलिगढमध्ये.

१४ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार एका कुटुंबीयांनी २०१५ रोजी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तिला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही दिवसांनंतर आग्र्यामध्ये त्याच वयाच्या आणि अंगकाठीच्या एका मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचंही तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. त्यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे या हत्याप्रकरणात २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. त्यानेच या मुलीचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. हा आरोप न्यायालयात सिद्धही झाला. त्यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकार लवकरच देणार रोजगाराची संधी

आता या घटनेला सात वर्षे उलटून गेली. मात्र, सात वर्षांनंतर ती संबंधित मुलगी जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीने हाथरसमध्ये आपला संसार थाटला असून ती आता २१ वर्षांची आहे. तिला आता दोन मुलंही आहेत. तिच्या पालकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठलं आणि पुढील कार्यवाहीला वेग आला. मुलीला चौकशीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार, तिला अलिगढमधील प्रोटेक्शन सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे.

- Advertisement -

या मुलीची आता डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे. ही मुलगी संबंधित कुटुंबाचीच असल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तिच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेल्या तरुणाला सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा – सीमावाद पेटला : कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्राच्या ६ वाहनांवर हल्ला

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -