घरअर्थजगतमोठी बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत तब्बल १०० रुपयांची कपात

मोठी बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत तब्बल १०० रुपयांची कपात

Subscribe

नवी दिल्ली – गगनाला भिडणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरांत तब्बल १०० रुपायांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात या महिन्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार, दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर दरात ९१.५० रुपयांची घट झाली, कोलकात्यात १०० तर मुंबईत ९२.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती गॅस कंपन्या ठरवत असतात. त्याप्रमाणे गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या दरांत ३६ रुपायंची कपात करण्यात आली होती. गॅ सिलिंडर दरांत कपात करण्यात आल्यानंतर दिल्लीत प्रति सिलिंडर १८८५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी १८४४ रुपये मोजावे लागणार आहेत. हाच दर कोलकातामध्ये १९९५.५ रुपये आहे.

- Advertisement -

घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे

दरम्यान, ६ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत सध्या गॅस सिलिंडरची किंमत १०५२ रुपये आहे. तर दिल्लीत १०५३ रुपये, कोलकाता १०७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १०६८ रुपये आहेत.

- Advertisement -

हॉटेलचे जेवण महागच

व्यावसायिक सिलिंडर दरांत कपात झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र एकीकडे किंमतीत कपात होत असतानाही हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून सतत किंमतीत कपात झाल्यानंतरही हॉटेलचे जेवण महागच राहिले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -