घरमहाराष्ट्रनाशिक'सिटीलींक'च्या वाहकांनी पुकारले कामबंद; प्रवाशांचे हाल

‘सिटीलींक’च्या वाहकांनी पुकारले कामबंद; प्रवाशांचे हाल

Subscribe

तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने पुकारले कामबंद आंदोलन; शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली

नाशिक : नाशिक शहरात दोन वर्षांपूर्वी धुमधडाक्यात नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या वतीने खाजगी तत्वावर सिटीलिंक ही सार्वजनिक शहर बससेवा सुरू करण्यात आली. ही बससेवा खाजगी ठेकेदारांच्या माध्यमाध्यमातून चालवली जात आहे. ठेकेदाराने बससेवेसाठी कंत्राटी पद्धतीने अनेक वाहक व चालकांची भरती केली. मात्र वेळोवेळी त्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत राहत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सुरवातीला दबक्या आवाजात होत असलेल्या तक्रारी उघडपणेही होऊ लागल्या. परंतु त्याबाबत ठेकेदार कोणताही प्रतिसाद देत नसल्याने शुक्रवारी (दि.१) वाहक कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे. प्रामुख्याने तीन ते चार महिने पगार न होणे, कामाच्या वेळेबाबत सुसूत्रता नसणे, जाचक अटी अश्या कारणांमुळे आंदोलन पुकारल्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं. जोपर्यत तोडगा निघत नाही तोपर्यन्त आंदोलन सुरूच राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तीन ते चार महिने वेतन थकीत राहणे तसेच कामाच्या जाचक अटी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही ठेकेदाराकडून कोणतेही ठोस पाऊल न उचलल्या गेल्याने नाशिक महानगरपालिका परिवहन मंडळाच्या ‘सिटीलिंक’ बससेवेच्या ठेकेदारांच्या कंत्राटी वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सिटीलिंकच्या तपोवन आणि नाशिकरोड डेपोमधून शुक्रवार (दि.१) सकाळपासून एकही बस रवाना झालेली नाही. त्यामुळे शहरात अचानक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारल्याने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

- Advertisement -

खरंतर, दोन वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिका वाहतूक मंडळाच्या वतीने खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून ‘सिटीलिंक’ सार्वजनिक शहर बससेवा सुरू केली. त्यात ठेकेदाराने कंत्राटी पद्धतीने शेकडो चालक, वाहक, कर्मचारी यांची भरती केली. मात्र ठेकेदार वेळेत पगार देत नाही, कामाच्या वेळेत सुसूत्रता नाही, कामाच्या वेळी जाचक अटी लादल्या जातात अश्या अनेक तक्रारी दबक्या आवाजात होत होत्या. याबाबत सुरवातीला कर्मचारी समोर येऊन बोलत नसले तरी मागील काही महिन्यात कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या ठेकेदार त्याचसोबत महानगरपालिका प्रशासनाकडे मांडल्या मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तसेच सद्यस्थितीत सणासुदीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार थकीत असल्याने कर्मचाऱ्यांना अखेर कामबंद आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -