घरताज्या घडामोडीViral Video : मोदी म्हणतात मास्क नको

Viral Video : मोदी म्हणतात मास्क नको

Subscribe

'मोदींसारख वागू नका, मास्क घाला', असा सल्ला आम आदमी पक्षाने दिला आहे

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे आरोग्य मंत्रालय वारंवार सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यास सांगत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना वारंवार मास्क लावा, सॅनिटायझर लावण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाला भेट दिल्याचे दिसत आहे. त्या कार्यक्रमात स्टॉल लावलेली व्यक्ती मोदी यांना मास्क घेण्यास आग्रह करतात. मात्र, वारंवार आग्रह करुनही मोदी मास्क घेण्यास नकार देताना दिसत आहेत.

- Advertisement -

आम आदमीने शेअर केला व्हिडिओ

आम आदमी पक्षाने हा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ शेअर करताना ‘मोदींसारख वागू नका, मास्क घाला’, अशी उपहासात्मक टीका केली आहे. तसेच या व्हिडिओवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तर लोकांची उपासमार होईल, तुम्ही एखादे शहर ब्लॉक करू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -