घरताज्या घडामोडीदहा रुपयाच्या नोटेवर गांधींऐवजी गोडसेचा फोटो, ABVPच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

दहा रुपयाच्या नोटेवर गांधींऐवजी गोडसेचा फोटो, ABVPच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Subscribe

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेच्या १११ व्या जन्मदिनानिमित्ताने मध्य प्रदेशमधील ABVP च्या कार्यकर्त्याने भलतीच श्रद्धांजली वाहिली. सीधी जिल्ह्याचा ABVP च्या महासचिवाने दहा रुपयांच्या नोटेवरील गांधीजींच्या फोटोवर गोडसेचा चिटकवला आहे. हा फोटो त्याने सोशल मीडियावर टाकत ‘नथुराम गोडसे अमर रहे’ असे कॅप्शन देखील दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत असून लोक याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सीधी जिल्ह्याचा ABVP या संघटनेचा महासचिव शिवम शुक्ला याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर १० रुपयाच्या नोटेचा एक फोटो शेअर केला आहे. यावर जिथे महात्मा गांधींचा फोटो असतो, तिथे नथुराम गोडसेचा चेहरा दिसत आहे. १९ मे रोजी शुक्लाने ही पोस्ट त्याच्या अकाऊंटवर टाकली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “रघुपती राघव राजा राम, देश बचा गए नथूराम. अमर महात्मा पूज्य श्री नथूराम गोडसे जी के जन्म दिवस पर कोटि-कोटि वंदन. नथूराम गोडसे अमर रहे.”

- Advertisement -
nathuram godse on 10 rs note
शिवम शुक्लाची फेसबुक पोस्ट

ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही राष्ट्रीय स्वयं सेवक संघाशी निगडीत विद्यार्थी संघटना आहे. शिवम शुक्लाने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर तो या संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटलेले आहे. तसेच सीधी लोकसभेच्या खासदार रिती पाठक यांच्यासोबत शुक्लाचा एक फोटो असून तो खासदारांच्या परियचातील असल्याचे बोलले जात आहे.

शुक्लाच्या या पोस्टनंतर काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने याची दखल घेतली असून पोलिसांत तक्रार केली आहे. NSUI चे जिल्हा अध्यक्ष दीपक मिश्रा यांनी सीधी येथील पोलीस स्थानकात याची तक्रार देत नथूराम गोडसे याचा प्रचार केल्यामुळे शुक्लावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच शुक्लाने ही पोस्ट टाकून गांधी यांच्या अनुयायांना डिवचण्याचे काम केले आहे. सध्या लॉकडाऊन असून अशा राजकारणाला थारा दिला जाता कामा नये, यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी, असे मिश्रा याने पोलिसांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -