घरदेश-विदेशकामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, २४ हून अधिक मजूर जखमी

कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, २४ हून अधिक मजूर जखमी

Subscribe

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. या घटनेत २४ हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस जयपूरहून पश्चिम बंगालकडे जात होती. सवारनवाब गंजातील साहवपूरजवळ बस महामार्गावर खाली कोसळली. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

आज पहाटे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या अपघातात दोन प्रवासी कामगारांचा मृत्यू झाला. प्रवासी कामगारांनी भरलेली पिकअप व्हॅन विजेच्या खांबाला धडकली. त्यानंतर व्हॅन पलटी झाली आणि दोन कामगार ठार झाले. खेदाची बाब म्हणजे २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर परप्रांतीय मजुरांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

बर्‍याच ठिकाणी कामगार अडकून पडले, त्यानंतर त्यांनी पायी घराकडे जाण्यास सुरवात केली. काही ठिकाणी कामगार चालताना दिसले तर बर्‍याच ठिकाणी मजूर सायकलवरून घराकडे निघाले. काहीजण बस आणि ट्रकमधून प्रवास करूनही त्यांच्या घरी जात आहेत.


हेही वाचा – ३१ ऑगस्टपर्यंत ईएमआयमध्ये सवलत; जाणून घ्या ७ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

- Advertisement -

कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारकडून श्रमिक ट्रेन चालवली जात असून त्यामध्ये ३० लाखाहून अधिक मजूर घरी परतल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, स्थलांतरित मजुरांची संख्या इतकी जास्त आहे की प्रत्येकास अद्याप मदत पोहोचलेली नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -