घरताज्या घडामोडीअंबानी आणि अदानी यांच्यात काँटे की टक्कर ,काय आहे नेमके प्रकरण?

अंबानी आणि अदानी यांच्यात काँटे की टक्कर ,काय आहे नेमके प्रकरण?

Subscribe

बिझनेस म्हटला की त्यात स्पर्धा ही आलीच. त्यातही जर बिझनेसमधले दोन शहेनशाह एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले तर चर्चा ही होणारच. अशीच चर्चा सध्या देशात सुरू झाली आहे. कारण या दोन दिग्गजांपैकी एक आहेत रिलायन्सचे समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांना आव्हान देणारे अदानी समूहाचे गौतम अदानी.

नेमके काय आहे प्रकरण?
आतापर्यंत देशभरात पेट्रोकेमिकल क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL)एकहाती वर्चस्व आहे. गेली अनेक वर्ष रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल व्यवसायासमोर कोणतीही दुसरी कंपनी फार काळ तग धरू शकलेली नाही. पण आता अदानी समूह पेट्रोकेमिकल व्यवसायात उतरला असून अदानी पेट्रोकेमिकल्सची स्थापनाही करण्यात आली आहे. पेट्रोकेमिकल व्यवसायात रिलायन्सचे वर्चस्व आहे हे ठाऊक असूनही अदानी समूहाने या व्यवसायात एन्ट्री केल्याने तज्त्रांच्या भुवया उंचावल्या आहेत. अदानीचे पेट्रोकेमिकल व्यवसायात पदार्पण म्हणजे अंबानी समूहाला आव्हानच असल्याचे तज्त्रांचे मत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात रिलायन्सने आपला जम बसवला आहे. त्या प्रत्य़ेक क्षेत्रात अदानी उतरले आहेत. अदानी पेट्रोकेमिकल्सच्या माध्यमातून रिफायनरी, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, स्पेशलिटी केमिकल, हायड्रोजन स्पेशलिटी केमिकल युनिट्स, आणि त्याच्याशी संबंधित रासायनिक प्रकल्प अदानी समूह सुरू करत आहे.

गेल्या वर्षी गौतम अदानी यांनी अदानी ग्रीन एनर्जीच्या २५ गीगावॉट रिन्यूएबल एनर्जीने उत्पादनचे लक्ष्य कमी वेळेतच गाठल्याचे जाहीर केले होते. अदानी समूहाने त्यासाठी २०२०-२१ लक्ष्य ठेवले होते. पण अपेक्षित वेळेआधीच त्यांच्या समूहाला यात यश मिळाले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे अदानी समूहाने पोर्ट, एअरपोर्ट, गॅस वितरणसारख्या अनेक व्यवसायात हातपाय पसरण्यासही सुरूवात केली आहे. पण आता थेट पेट्रोकेमिकल क्षेत्रात उतरत अंबानीच्या रियालन्स समूहाला आव्हान केले आहे. ३० जुलैला अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (APL)स्थापना करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे नुकतेच मुकेश अंबानी यांनीही येत्या तीन वर्षात पेट्रोकेमिकल व्यवसायात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे ५, ०००० एकर जमिनीवर धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्पलेक्सच्या निर्मितीस सुरुवातही केली आहे. यामुळे येत्या काळात अंबानी विरुद्ध अदानी यांच्यातील बिझनेस वॉर देशाला बघायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -