घरताज्या घडामोडीअफगाणि नागरिकांची पाकिस्तानकडे धाव, सीमारेषेवर उसळली गर्दी

अफगाणि नागरिकांची पाकिस्तानकडे धाव, सीमारेषेवर उसळली गर्दी

Subscribe

अफगाणि नागरिकांचा गर्दी असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ काबुल विमानतळावरचा नसून अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेरेषेवरील स्पिन बोलदाकचा आहे.

तालिबानच्या भीतीने देश सोडणाऱ्या अफगाणि नागरिकांचा काबुल विमानतळावरचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर असाच अफगाणि नागरिकांचा गर्दी असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ काबुल विमानतळावरचा नसून अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेरेषेवरील स्पिन बोलदाकचा आहे. हजारो अफगाणि नागरिक पाकिस्तानमध्ये प्रवेश करण्यासाठी येथे जमा झाले आहेत.

पत्रकार नातिक मलिकझादे यांनी टि्वट करत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात हे काबुल विमानतळ नसून स्पिन बोलदाक सीमा असल्याचं यात त्यांनी म्हटल आहे. तसेच येथे कोणत्याही देशाचे सैनिक नसल्याने अफगाणि नागरिकांनी देश सोडून जाण्यासाठी येथे गर्दी केल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

जेव्हापासून अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे तेव्हापासून स्थानिक देश सोडून जात आहेत. तसेच ज्या ज्या देशांचे नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत त्यांना मायेदशी नेण्यासाठी त्या त्या देशांनी रेस्क्यु ऑपरेशन सुरू केलं आहे. दररोज अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, युक्रेनची विमान आपल्या नागरिकांबरोबरच अफगाणि नागरिकांनाही नेत आहेत. आतापर्यंत तब्बल ८० हजार नागरिकांनी अफगाणिस्तान सोडला आहे. भारताचेही रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. पण आता तालिबानने अफगाणि नागरिकांना देश सोडून जाण्यास बंदी घातली आहे. यामुळे अफगाणि नागरिक हादरले असून मिळेल त्या मार्गाने ते देश सोडण्याच्या तयारीत आहेत. काबुल विमानतळावर तालिबान्यांची नजर असून जो अफगाणि नागरिक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करेल त्याला थेट गोळ्या घालण्याचे फर्मानच तालिबान्यांनी काढले आहे. यामुळे तालिबान्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अफगाणि नागरिकांनी अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या स्पिन बोलदाक सीमेवरून पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी गर्दी केली आहे. आतापर्यंत १४ लाख अफगाणि नागरिकांनी पाकिस्तानचा आश्रय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -