घरताज्या घडामोडीKabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ आज पुन्हा एअरस्ट्राइक

Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ आज पुन्हा एअरस्ट्राइक

Subscribe

अफगाणिस्तानची राजधानी काबूल विमानतळाजवळ आज सोमवारी पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. तीन सीरियल बॉम्बस्फोटानंतर काबूल विमानतळाजवळ हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एअरस्ट्राईक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानची राजधानी काबूल सोमवारी सकाळी पुन्हा रॉकेट डागण्यात आले. काबूल येथील विमानतळाजवळ सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. या रॉकेट्समुळे विविध ठिकाणी धूराचे साम्राज्य वाढत आहे, अनेक ठिकाणी आगही लागल्याने बऱ्याच वाहनांचे नुकसान झाले आहे. हा गोळीबार किंवा एअर स्ट्राईक कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तालिबान्यांनी ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची संख्या अचानक वाढू लागली आहे. रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर आज सोमवारी सकाळी काबूल विमानतळाजवळ पुन्हा रॉकेटचा आवाज ऐकू आला. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर अनेक रॉकेट उडताना दिसून आले. या वृत्तसंस्थेच्या मते, काबूल विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, त्यांनी मिसाइल डिफेन्सिव सिस्टम सक्रिय झाल्याचा आवाज ऐकला. त्याचवेळी विमानतळाजवळ धूराचे लोट उठताना देखील दिसले.

- Advertisement -

स्थानिक माध्यमांनुसार, काबूल विमानतळाजवळ विद्यापीठाच्या बाजूने एका वाहनातून रॉकेट डागण्यात आले. काबूल एअर फील्ड डिफेन्स सिस्टीमने अनेक रॉकेटवर प्रतिवार करून परत पाठवली आहेत. दरम्यान, ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकन लष्कर काबूल सोडणार आहे आणि त्यापूर्वी काबूल विमानतळ आणि आसपासच्या क्षेत्राबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वीही काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये १३ अमेरिकन सैनिकांसह शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले होते.

यापूर्वी रविवारी, अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटशी संबंधित अनेक आत्मघाती हल्लेखोरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य केले. ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आत्मघाती हल्लेखोरांना काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन लष्कराच्या निर्वासन ऑपरेशनला लक्ष्य करायचे होते. जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू होते, तेव्हा हा रॉकेट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावेळी हजारो लोकांना काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तान अराजक स्थितीत बघायला मिळत आहे.

- Advertisement -

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -