घरदेश-विदेशबुराडीनंतर आता रांचीत सामूहिक आत्महत्या

बुराडीनंतर आता रांचीत सामूहिक आत्महत्या

Subscribe

सकाळी स्कूल बस आल्यानंतर घरातील लहान मुलाला सोडायला झा कुटुंबातील कोणीच बाहेर आले नाही. त्यामुळे घरमालकाने एकाला त्यांना बोलावून आणायला पाठवले. त्या माणसाने दरवाजा ढकलला. तेव्हा ...

बुराडीतील भाटिया कुटुंबातील ११ जणांच्या आत्महत्येवरुन पडदा उठत नाही तोच देशभरात सामूहिक आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. झारखंडमधील सामूहिक आत्महत्येनंतर आता रांचीत एकाच कुटुंबातील सगळ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रांचीतील वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक अनिश गुप्ता यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली असून ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक विवंचनेत कुटुंब

रांचीत राहणाऱ्या दीपक झा (४०) यांचे हे कुटुंब असून कुटुंबातील सातही जणांनी आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब आर्थिक विवंचनेत असल्याचे झा कुटुंब ज्या घरात भाड्याने राहत होते. त्या घरमालकाने ही माहिती दिली आहे. शिवाय या कुटुंबाने काही महिन्यांपासून भाडे देखील दिले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. शिवाय अनेक ठिकाणी त्यांची थकबाकी होती या आर्थिक विवंचनेतूनच या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे देखील कळत आहे.

- Advertisement -
वाचा- बुराडीनंतर आता झारखंडमध्ये ६ जणांनी संपवले आयुष्य

लहान मुलाला लावला गळफास

सकाळी स्कूल बस आल्यानंतर घरातील लहान मुलाला सोडायला झा कुटुंबातील कोणीच बाहेर आले नाही. त्यामुळे घरमालकाने एकाला त्यांना बोलावून आणायला पाठवले. त्या माणसाने दरवाजा ढकलला. तेव्हा लहान मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत होता. तर उरलेले सगळे आजूबाजूला पडलेले होते. त्याने तातडीने घरमालकाला कळवले आणि घरमालकाने पोलिसांना बोलावले. झा कुटुंबातील  दीपक झा (४०), त्यांची बायको सोनी झा, त्यांची मुलगी द्रिष्टी (७), मुलगा गंजू आणि दीपकचे आई-वडील यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

वाचा- बुराडी आत्महत्या प्रकरण: आजीच्या मृत्यूचे गूढ कायम

मुलाच्या आजारपणामुळे हैराण

झा कुटुंब जानेवारी महिन्यात या नव्या घरात राहायला आले होते. या ठिकाणीच दीपकला मुलगा झाला. त्याला काही तरी विकार असून त्याच्या उपचाराचा खर्च १३ लाख रुपये आहे, असे त्याने घरमालकाला सांगितले होते. अनेकदा घरमालकाने डॉक्टरांचे पैसे दिल्याचे सांगितले. त्यामुळे ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -