घरदेश-विदेशऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरण: आरोपी मिशलने घेतले सोनिया गांधी यांचे नाव

ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरण: आरोपी मिशलने घेतले सोनिया गांधी यांचे नाव

Subscribe

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला वगळून हा करारा टाटासोबत कसा करण्यात आला, याची देखील माहिती दलाल ख्रिस्तीयन मिशेलने ईडीला दिली आहे. दरम्यान, ईडीच्या चौकशीत मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी दलाल ख्रिस्तीयन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे. सोनिया गांधींसोबतच मिशेलने इटलीच्या महिलेच्या मुलाचे नाव घेतल्याचे सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) न्यायालयाला सांगितले आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला वगळून हा करारा टाटासोबत कसा करण्यात आला, याची देखील माहिती त्याने दिली आहे, असे ईडीने न्यालयात सांगितले. त्याचबरोबर मिशेलने उल्लेख केलेला इटलीचा महिलेचा मुलगा भविष्यात कशाप्रकारे पंतप्रधान बनवू शकतो, हे देखील सांगितले आहे. दरम्यान, मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव जरी घेतले असले तरी ते कशासाठी घेतले, हे सध्या सांगू शकत नाही, असे ईडीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण ; मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलला CBI कोठडी

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी ३ हजार ६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती. इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली करण्यात आला होता. यामधील ८ हेलिकॉप्टर्स राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वापरली जाणार होती. तर उर्वरित ४ इतर कारणांसाठी वापरली जाणार होती. परंतु, या व्यव्हारामध्ये लाचखोरी झाल्याचे उघड झाले. हा व्यवहार व्हावा म्हणून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने देशातील विविध लोकांना ३६० कोटी रुपयांपर्यंत लाच दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर हा व्यवहार १ जानेवारी २०१४ रोजी रद्द करण्यात आला. या प्रकरणी माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, तत्कालीन प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची देखील नावं आली होती. या प्रकरणाची खटला सध्या न्यायालयात सुरु असून ईडी याची चौकशी करीत आहे. ईडी या घोटाळ्यातील मुख्य आरोपी ख्रिस्तीयन मिशेलची कसून चौकशी करत आहे. मिशेलने ईडीच्या चौकशीत सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र, तो उल्लेख का केला आहे, याचा तपास ईडी घेत लावत आहे.


हेही वाचा – ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; मिशेलला २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयिन कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -