घरदेश-विदेशडोळ्यांच्या हालचाली उलगडतात व्यक्तिमत्व !

डोळ्यांच्या हालचाली उलगडतात व्यक्तिमत्व !

Subscribe

या अभ्यासाचा उपयोग भविष्यातील कॉम्प्युटर्स आणि रोबोट्सना भावनाशील आणि नैसर्गिक बनवण्यासाठी होईल, असं संशोधक सांगतात.

संशोधकांनी आर्टिफिशअल इंटलिजन्सच्या साहाय्याने एक नवीन प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीच्या मदतीने चक्क तुमच्या डोळ्यांच्या हालचालींवरुन तुमचं व्यक्तिमत्व ओळखता येणार आहे. आर्टिफिशल इंटलिजन्सने विकसीत केलेली ही सिस्टीम तुमच्या डोळ्यांच्या हालचालींना स्कॅन करुन तुमचा स्वभाव आणि तुमची एकंदर पर्सनॅलिटी कशी आहे याविषयी सांगेल. एखादी व्यक्ती मनमिळावू आहे की रागीट आहे, एकलकोंडी आहे की भित्रट आहे… या सगळ्याचा शोध आता केवळ तुमच्या डोळ्यांच्या हालचालींवरुन समजणार आहे. याच स्कॅनिंग प्रणालीचा वापर करुन संशोधकांनी आतापर्यंत काढलेल्या निष्कर्षानुसार, माणसाच्या पर्सनॅलिटीचे ५ मुख्य पैलू समोर आले आहेत.

डोळे सांगतात मनातले भाव

संशोधकांच्या आजवरच्या अभ्यासानुसार माणसं त्यांच्या डोळ्यांच्या हालचालींमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पुढील ५ पैलू दाखवतात. नम्रपणा, राग, अस्वस्थता, प्रामाणिकपणा आणि सहमत असण्याची भावना… माणसं आपल्या डोळ्यांमधून व्यक्त करत असतात. साऊथ ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ डॉ. टोबाईल लोएस्टर यांच्या म्हणण्यानुसार, ‘बहुतांशी लोकांच्या डोळ्यातून ते सतत सुधारणेच्या आणि वैयक्तिक समाधान देणाऱ्या गोष्टींच्या शोधात असल्याचे जाणवते’.

- Advertisement -

तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी…

माणसांच्या डोळ्यांवरुन भावना जाणून घेण्याचा हा शोध अभ्यास, भविष्यात तंत्रज्ञान विकसाच्या दृष्टीने करण्यात येणार असल्याचं, डॉ. लोएस्टर यांनी सांगितलं आहे. या अभ्यासातील निष्कर्षांचा उपयोग भविष्यातील कॉम्प्युटर्स आणि रोबोट्सना अधिक भावनाशील आणि नैसर्गिक बनवण्यासाठी होईल, असं डॉ. लोएस्टर सांगतात., असं डॉ. लोएस्टर सांगतात. दरम्यान हा खास शोध अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीची एक संशोधन संस्था यांनी भागदारीमध्ये केला होता. ज्यामध्ये एकूण ४२ लोकांच्या डोळ्यांच्या हालचालींचा अभ्यास करुन, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तसंच त्यांच्या मनातील भावनांचा शोध घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -