घरदेश-विदेशजेटनंतर आता एअर इंडियाचा क्रमांक? पगारासाठी पैशांची अडचण

जेटनंतर आता एअर इंडियाचा क्रमांक? पगारासाठी पैशांची अडचण

Subscribe

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. या कंपनीकडे आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगाराची रक्कमच नसून जेमतेम ऑक्टोबरपर्यंतच त्यांचे पगार कंपनी करू शकत असल्याचे वृत्त आहे. कंपनीची स्थिती चांगली नसण्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. अलिकडेच जेट एअरवेज कंपनी बंद पडली असून तिच्यातील कर्मचाऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर आता एअर इंडियाबद्दलही बातम्या येत आहेत.

या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले की केंद्र सरकारने एअर इंडियाला सार्वभौम हमीच्या अंतर्गत ७ हजार कोटी रूपयांचा निधी दिला होता. त्यापैकी या विमान कंपनीकडे आता केवळ अडीच हजार कोटीच शिल्लक असून त्याचा वापरही लवकरच होणार आहे. रोकड टंचाईमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

- Advertisement -

या अधिकाऱ्याने सांगितले की कर्मचाऱ्यांची थकबाकी आणि देणे चुकते करण्यावरच मोठी रक्कम खर्च होणार आहे. मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होत असून मे महिन्याचा पगारही त्यांना १२ दिवस उशिरा मिळाला. एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरमहा ३०० कोटी रुपये खर्च होतात. पाच जुलैला मांडण्यात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात या बद्दल विशेष मागणी करण्यात आलेली नाही. याबद्दल अधिकाऱ्याने सांगितले की अंतरिम बजेटमध्ये आम्ही आमच्या मागण्या मांडल्या होत्या, त्याच या अर्थसंकल्पात मांडण्यात येणार आहेत.

दरम्यान रोकड संकटाचा सामना केवळ विमान कंपन्यांना नव्हे, तर बीएसएनएललाही करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या स्थितीत ही कंपनीही नसल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -