घरमुंबईपावसामुळे आज अधिवेशनात आमदारही राहणार उपाशी!

पावसामुळे आज अधिवेशनात आमदारही राहणार उपाशी!

Subscribe

मुंबईकरांना मुसळधार पावसाचा फटका बसला असतानाच आता विधानभवनातल्या आमदारांना देखील पावसाचा फटका बसला आहे. आज त्यांना उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पावसामुळे एकीकडे मुंबईकर वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असतानाच दुसरीकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार देखील पोहचताना अडकून पडल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, सोमवारी सकाळी विधानभवनातल्या या आमदारांवर पावसामुळेच उपाशी राहण्याची देखील वेळ आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसोबतच विधानभवनातल्या आमदारांना देखील आज पावसाची काही प्रमाणात का होईना, झळ पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.

का राहणार आमदार उपाशी?

मुंबईत सगळीकडे मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आणि रस्ते-रेल्वे बंद झाले. त्यामुळे अनेक ठिकाणचे कर्मचारी कामावर पोहोचू शकलेले नाहीत. विधिमंडळामध्ये २ कँटीन आहेत. एरवी या दोन्ही कँटीनमध्ये बसायला देखील जागा मिळत नाही इतकी गर्दी अधिवेशन काळात असते. आज मात्र या दोन्ही कँटीनला टाळ ठोकण्यात आलं आहे. कारण, पावसामुळे इतर मुंबईकरांप्रमाणेच या कँटीनचे कर्मचारी देखील पोहोचू शकलेले नाहीत. विधिमंडळात आमदारांप्रमाणेच त्यांच्या बंदोबस्तासाठीचे पोलीस, होमगार्ड, मंत्री, त्यांचा कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत असतात. या सगळ्यांच्या चहापानाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ही कँटिनमधूनच होत असते. मात्र, आता कँटीनच बंद असल्यामुळे या सगळ्यांवर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

अजित पवारांचं सरकारला खोचक आव्हान – ..मुंबई आहे तशी तरी ठेऊन दाखवा!

मुख्यमंत्र्यांनाही बाहेरचा नाष्टा

दरम्यान, पावसाचा फटका फक्त आमदारांनाच बसला नसून तो काही प्रमाणात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील बसला आहे. नेहमी मुख्यमंत्र्यांसाठी कँटीनमधून चहा-नाश्त्याची व्यवस्था केली जाते. आज मात्र, कँटीन बंद असल्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांसाठी बाहेरून चहा-नाश्ता मागवावा लागला आहे. मात्र, असं असलं, तरी इतर आमदारांना चहा-नाश्त्यापासून वंचित राहावे लागले आहे.

मालाडची भिंत पडली; पण ती कधी बांधली होती माहितीये का?

मालाडची भिंत पडली; पण ती कधी बांधली होती माहितीये का?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 1, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -