घरदेश-विदेशअजित पवारांचे "स्टार" चमकणार कधी? कर्नाटकात "प्रचारक"ही नाहीत

अजित पवारांचे “स्टार” चमकणार कधी? कर्नाटकात “प्रचारक”ही नाहीत

Subscribe

कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांच्या यादीतूनच अजित पवार यांच्या नावाला डच्चू देण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

अजित पवार हे लवकरच राजकीय भूकंप घडवून आणणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण जीवात जीव असे पर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पण तरी देखील पक्षाच्या अंतर्गत घडणाऱ्या काही गोष्टींमुळे अजित पवार यांना पक्ष कुरघोड्या करून बाहेर काढणार की त्यांच्या कृ्त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. कारण अजित पवार यांचे मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रम शिबीराच्या प्रसिद्धी पत्रकातून नाव वगळण्यात आले होते. पण अजित पवार यांचे आधीच कार्यक्रम ठरलेले असल्याने त्यांचे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकातून नाव वगळण्यात आले असे सांगत याबाबत होणाऱ्या चर्चांवर पडदा टाकण्यात आला. मात्र, आता कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांच्या यादीतूनच अजित पवार यांच्या नावाला डच्चू देण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादी पक्षाकडून शुक्रवारी करण्यात आली. यानंतर पक्षाकडून १० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह १५ पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. पण या यादीमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा रंगली होती. अचानकपणे अजित पवार यांचे नॉट रिचेबल होणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे, शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने स्थिर राहील याबाबत माहिती देणे, ईव्हीएमचे समर्थन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा करणे अशा विविध कारणास्तव ते भाजपामध्ये जाणार असल्याचे ठोकताळे बांधण्यात आले होते. मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही शक्यता फेटाळत, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्या मदतीने केलेल्या कोंडीमुळे अजित पवार यांचे भाजपाप्रवेशाचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले मत, म्हणाले…

- Advertisement -

परंतु, आता अजित पवार यांच्या विरोधातच पक्षाने कुरघोड्या सुरू केल्याने त्यांची पक्षाकडून कोंडी करण्यात येत आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. तर शुक्रवारी (ता. २१ एप्रिल) एका वृ्त्त समुहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी मी आत्ताही मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतो, असे वक्तव्य केल्याने ते खरंच भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतात, असे बोलले जाऊ लागले आहे.

दरम्यान, आता अजित पवार यांचे नाव पक्षाकडून सगळीकडूनच हटवण्यात येत असल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अजित पवार यांच्यासोबत नेमके काय करायचे आहे? शरद पवार हे हळूहळू त्यांचा पुतण्याचाच म्हणजे अजित पवार यांचा राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -