घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले मत, म्हणाले...

अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले मत, म्हणाले…

Subscribe

अजित पवार यांनी मी आताही मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतो, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चांना उधाण आले आहे. पण त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मत व्यक्त केले आहे.

अजित पवार एका वृत्तवाहिनीला शुक्रवारी (ता. २१ एप्रिल) मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मी आताही मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतो, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चांना उधाण आले आहे. पण त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मत व्यक्त केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बहुमताच्या बाजूने आले तर किंवा दहा वीस वर्षांनी त्यांना बहुमत मिळाले तर ते मुख्यमंत्री होई शकतात, असे रावसाहेब दानवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलत असताना दानवेंनी असे विधान केले आहे.

यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यामुळं दावा करणं आणि बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे. अजित पवार बहुमताच्या बाजूने आले किंवा दहा-वीस वर्षांनी त्यांना कदाचित बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाजही दानवेंनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

तर रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या काही आरोपांचे देखील खंडन केले आहे. शिवसेनेतून फूटून आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा सरकारी यंत्रणांनी मदत केली असा आरोप अजित पवार यांनी याआधी केला होता. या आरोपांचे दानवेंनी खंडन करत म्हटले आहे की, जर आमदार संरक्षण मागत असतील तर राज्यघटनेप्रमाणे त्यांना संरक्षण देण्याचे काम सरकारी यंत्रणा करते. सरकार बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत सरकारने केली नाही, अशी माहिती देखील दानवे यांच्याकडून देण्यात आली.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या ‘अक्षय्य तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अवतीभवती फिरताना दिसून येत आहे. सगळ्यांचेच त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे. दरम्यान, वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवार यांना आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर क्लेम २०२४ ला का? आताच करणार, अस म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकली होता.

याशिवाय, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “२००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं”, असे उत्तर अजित पवारांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -