घरदेश-विदेशअरविंद केजरीवाल यांच्या बैठकीत आपचे सर्व आमदार उपस्थित, ऑपरेशन लोटस फसणार?

अरविंद केजरीवाल यांच्या बैठकीत आपचे सर्व आमदार उपस्थित, ऑपरेशन लोटस फसणार?

Subscribe

आम आदमी पक्षाने पॉलिटीकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत सर्व आमदारांच्या बैठकीचं नियोजन केलं होतं. यानुसार, आज केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू आहे.

नवी दिल्ली – दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी आपच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, बैठकीला सर्व आमदार उपस्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्व आमदार बैठकीला पोहोचले असून ८ आमदार दिल्लीच्या बाहेर असून मनीष सिसोदिया हिमाचल, राम निवास गोयल अमेरिकेत आहेत. मात्र, या सर्वांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजेरी लावली आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण ६२ आमदार आहेत.

आपच्या चार आमदारांना भाजपाने २० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील आमदारांनाही भाजप खरेदी करेल अशी भिती आपला वाटत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने पॉलिटीकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत सर्व आमदारांच्या बैठकीचं नियोजन केलं होतं. यानुसार, आज केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू आहे.

- Advertisement -

दिल्लीत दारू नीती घोटाळ्यावरून वाद सुरू आहे. आम आदमी पक्षाच्या आमदारांना विकत घेण्याचा भाजपचा डाव फसल्याने भाजपच्या ऑपरेशन लोटसचा पर्दाफाश झाला होता. आपच्या काही आमदारांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांना भाजपने २० कोटींची ऑफर देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आपचे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत आणि भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी आपने आज बैठक बोलावली आहे.

हेही वाचा 20 कोटींची ऑफर दिल्याचा आपचा भाजपवर आरोप; दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग

- Advertisement -

आम आदमी पार्टी(aap) आणि भाजप(bjp) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच भाजपकडून आपच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपकडून प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी भाजपवर केला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या हातात आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप कडून धमक्यासुद्धा दिल्या जात आहेत, असा सुद्धा आरोप आपकडून भाजपवर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी आपच्या सर्व आमदारांची आज बैठक बोलावली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -