घरमनोरंजन'अवतार : द वे ऑफ वॉटर' 'या' दिवशी होणार प्रदर्शित

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

या दुसऱ्या सिक्वेलच नाव 'अवतार 2' नसून 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हे असणार आहे. ज्या प्रेक्षकांनी अवतार चित्रपट पाहिला आहे. त्यांना या चित्रपटातचा दुसरा भाग नक्कीच लक्षात येईल.

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाचा आता येत्या काळात दुसरा सिक्वेल येणार आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

या दुसऱ्या सिक्वेलच नाव ‘अवतार 2’ नसून ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हे असणार आहे. ज्या प्रेक्षकांनी अवतार चित्रपट पाहिला आहे. त्यांना या चित्रपटातचा दुसरा भाग नक्कीच लक्षात येईल. अवतार हा हॉलिवूडमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. ज्याने जगभरातील नामांकित चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई केलेली आहे. शिवाय आत्तापर्यंत या चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकलं नाही.

- Advertisement -

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 16 मे 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच हा इंग्लिश, हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील नवा लूक, अर्चना पूरणसिंहसोबत तुलना

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -