घरदेश-विदेशAmritsar Blast : पंजाबमध्ये 30 तासांत दुसरा भीषण स्फोट, पोलिसांकडून तपास

Amritsar Blast : पंजाबमध्ये 30 तासांत दुसरा भीषण स्फोट, पोलिसांकडून तपास

Subscribe

नवी दिल्ली : पंजाबमधील अमृतसरमध्ये (Amritsar) गेल्या 30 तासात दुसरा भीषण स्फोट (Blast) झाला आहे. सलग दोन दिवसांत दोन भीषण स्फोट झाल्यामुळे अमृतसरमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण शनिवारी रात्री घडलेल्या घटनेपासून आज झालेला स्फोट 200 मीटर अंतरावर आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अमृतसर येथील हेरिटेज स्ट्रीटवर सकाळी 6.30 वाजता भीषण स्फोट झाला असून या स्फोटात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय तिथे उभ्या असलेल्या गाडीच्या काचा तुटल्या आहेत. शनिवारी रात्रीही अमृतसरमधील हरमंदिर साहिबजवळील हेरिटेज स्ट्रीटवर देखील स्फोट झाला होता. यावेळी सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा सर्वत्र पसरल्या होत्या. या स्फोटात काही जण जखमी झाल्याचे समोर आले होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना घडली तेव्हा नागरिक हेरिटेज स्ट्रीटवरून चालत होते. अचानक स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

- Advertisement -

हेरिटेज स्ट्रीटवर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी स्फोटक द्रव आणि इतर काही संशयास्पद वस्तूंचे नमुने जमा केले आहे. पोलीस त्या परिसरातील आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे, तर फॉरेन्सिक टीमचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी नमुने ताब्यात घेतले आहेत.

- Advertisement -

दुकानाची चिमणी फुटल्यामुळे स्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हेरिटेज स्ट्रीटजवळील मिठाईच्या दुकानातील चिमणीचा स्फोट झाला होता. त्यामुळे दुकानाच्या काचा व इतर कचरा नागरिकांच्या अंगावर पडल्यामुळे काही भाविक जखमी झाले होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे नागरिकांनी या स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणून पाहण्यास सुरुवात केली, परंतु तपासानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की, हा दहशतवादी हल्ला नव्हता, तर हा अपघात होता. त्यांनी सांगितले की, स्फोट झाला असता तर इमारतीचे नुकसान झाले असते. चिणणीचा स्फोट झाल्यावर स्फोटाची चिन्हे दिसत होती, पण काहीही झाले नाही. बाहेरील थंड हवामान आणि पार्किंगच्या आतील आर्द्रतेमुळे काच फुटू शकतात,त असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -