घरदेश-विदेशकुटुंबिय करत आहेत माझा खर्च; अनिल अंबानी यांनी कोर्टासमोर मांडली व्यथा

कुटुंबिय करत आहेत माझा खर्च; अनिल अंबानी यांनी कोर्टासमोर मांडली व्यथा

Subscribe

उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. माझा खर्च कुटुंबिय करत असल्याचे त्यांनी लंडनमधील कोर्टासमोर म्हटले आहे. तसेच न्यायालयीन खटले लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकावे लागल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. अंबानी यांनी चीनमधील तीन ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अनिल अंबानी यांनी आपली आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कोर्टाला सांगितले आहे.

काय म्हणाले अनिल अंबानी

मी एक सामान्य जीवन जगत आहे. एकच गाडी वापरत आहे. आता पूर्वीसारखे माझे आयुष्य सुखासुखी राहिलेले नाही. इतकंच काय तर न्यायालयीन खटल्यांचा खर्च हा पत्नीचे दागिने विकून भागवला आहे. माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असे अंबानी यांनी सांगितले. या सुनावणीत पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेचा तपशील मागण्यात आला. तसेच अनिल अंबानी यांना खासगी हेलिकॉप्टर, यॉट, लक्झरी मोटार, लंडन, कॅलिफोर्निया आणि बिजिंगमधील शॉपिंगसंबधी प्रश्न विचारण्यात आले.

- Advertisement -

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (NCLT) ने अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल अंबानी यांच्या विरुद्ध दिवळखोरीची कारवाई सुरू केली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अनिल अंबानी यांनी कर्ज घेतले होते. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१६ साली अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इफ्राटेल या कंपन्यांना हे कर्ज दिले होते. या कर्जासाठी अंबानी यांनी १ हजार २०० कोटी रुपयांची पर्सनल गॅरेन्टी दिली होती. आता या दोन्ही कंपन्या बंद झाल्या आहेत.

हेही वाचा –

मुंबई पोलिसांनंतर CBI तपासावरही सुशांतचं कुटुंब नाराज; वकील विकास सिंह यांचा दावा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -