घरदेश-विदेशWHO चा इशारा; कोरोनाचा फैलाव सुरू राहिल्यास लस येईपर्यंत २० लाख बळींची...

WHO चा इशारा; कोरोनाचा फैलाव सुरू राहिल्यास लस येईपर्यंत २० लाख बळींची शक्यता

Subscribe

कोरोना सारख्या माहामारीवर प्रतिबंध आणण्यासाठी योग्य ती काळजी आणि कारवाई न केल्यास कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोनावरील लस जगात येईपर्यंत कोरोनाने प्राण गमावणाऱ्यांची संख्या २ दशलक्षांपर्यंत होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) एका अधिकाऱ्याने शुक्रवारी असे सांगितले की, कोरोना सारख्या माहामारीवर प्रतिबंध आणण्यासाठी योग्य ती काळजी आणि कारवाई न केल्यास कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर नऊ महिन्यांत मृतांची संख्या साधारण दहा लाखांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख माईक रयन म्हणाले, “नुकत्याच झालेल्या संसर्गाच्या वाढीसाठी तरुणांना जबाबदार धरू नये. तर जगात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर तरुण कोरोना विषाणूचा प्रसार करत आहे ही, चिंतेची बाब आहे.” यावेळी त्यांनी अशी आशा व्यक्त केली की आपण एकमेकांवर आरोप करणे थांबवूया. केवळ संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ तरुणांमुळे झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, होणाऱ्या सभेमुळे ही माहामारी वाढत असून यात सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. कोरोना लसीच्या संदर्भात सुरू असलेल्या कोवॅक्स लसीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी WHO चे बोलणे सुरू आहे. जेणेकरून जगातील कोविड -१९ ची लस तयार करण्यासह त्याचे वितरण वेगवान होऊ शकेल.

WHO चे वरिष्ठ मार्गदर्शक ब्रूस एयलवार्ड यांनी सांगितले की, “चीनच्या या भूमिकेबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. यामुळे पुढे जाण्यास मदत होईल.” त्यांनी डब्ल्यूएचओ कार्यक्रमात तैवानच्या सहभागाबद्दल देखील माहिती दिली. तैवान हा डब्ल्यूएचओचा सदस्य देश नाही. डब्ल्यूएचओच्या कोवॅक्स कार्यक्रमात भाग घेणार्‍या देशांची संख्या वाढून १५९ झाली आहे, तर ३४ देशांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.


Corona Update : चिंता कायम! कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख पार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -