घरदेश-विदेशअनिल अंबानी अब्जाधीशांच्या कॅटेगरीतून आऊट

अनिल अंबानी अब्जाधीशांच्या कॅटेगरीतून आऊट

Subscribe

सोमवारच्या व्यवहाराअंती त्यांच्या ६ कंपन्यांचे बाजार भांडवल ९ हजार १९६ कोटींवर स्थिरावले आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत २००८ साली सहाव्या क्रमांकावर असणारे रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आता थेट अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानींना अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.

कंपनीचे बाजार भांडवल घटले

अंबानी समूहावरील कर्जाची व्याप्ती वाढतच चालल्याने अंबानींच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारी शेअर बाजारातीलच्या व्यवहारांच्या अखेरीस अनिल यांच्या कंपनीचे बाजार भांडवल कमालीचे घटल्याने त्यांनी अब्जाधीशांच्या यादीत असणारे नाव गमावले आहे.

- Advertisement -

बाजार भांडवलात घट झाल्याने यादीतून आऊट

विविध कर्जांची परतफेड करताना अनिल अंबानी यांनी आपले साम्राज्य गमावले आहे. त्यातच सोमवारी शेअर बाजारातीलच्या व्यवहारांच्या अखेरीस कंपनीच्या बाजार भांडवलात बरीच घट झाल्याने अअनिल अंबानींना अब्जाधीशांच्या यादीतून आऊट झाले आहे. सोमवारच्या व्यवहाराअंती त्यांच्या ६ कंपन्यांचे बाजार भांडवल ९ हजार १९६ कोटींवर स्थिरावले आहे.

अंबानीकरिता आगामी काळ अडचणीचा 

२००८ साली ४२ अब्ज डॉलर इतकी संपत्ती असणाऱ्या अनिल अंबानींची संपत्ती आजच्या घडीला फक्त ५२.३ कोटी रूपये डॉलर म्हणजेच साधारण ३ हजार ६५१ कोटी रूपये एवढी आहे. या संपत्तीमध्ये अंबानीच्या कंपनीचे तारण ठेवलेल्या शेअर्सच्या मुल्यांचा देखील समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपुर्वी रिलायन्स समूहाचे मूल्य ८ हजार कोटी रूपये होते. रिलायन्स निप्पॉन लाईफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील आपला ४२.८८ टक्के हिस्सा विकल्यानंतर त्यांच्या संपत्तीत झपाट्याने घट होत आहे. याचाच परिणाम, येणारा काळ अनिल अंबानीकरिता अडचणींचा ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -