घरCORONA UPDATEधक्कादायक! एकाच सुईने 39 विद्यार्थ्यांना दिली कोरोनाप्रतिबंधक लस, आरोपी फरार

धक्कादायक! एकाच सुईने 39 विद्यार्थ्यांना दिली कोरोनाप्रतिबंधक लस, आरोपी फरार

Subscribe

या लसीकरण मोहिमेअंतर्गत 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील 39 मुले ज्यांचे लसीकरण करण्यात आले होते, हे सर्व विद्यार्थी इयत्ता 9वी ते 12 वीपर्यंतचे होते.

भारतात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरण मोहीम वेगाने चालवली जात आहे. महाराष्ट्रसह विविध राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर ही मोहीम सुरु आहे. मात्र मध्यप्रदेशमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सुरु असलेला धक्कादायक खेळ समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात 39 शाळकरी विद्यार्थ्यांना एकाच सुईने कोरोनाविरोधी लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी पालकांना याबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

सागर जिल्ह्यातील जैन उच्च माध्यमिक शाळेतीव विद्यार्थ्यांसाठी बुधवारी महालसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही विद्यार्थ्यांना लस देणारा व्यक्ती  एकाच सुईने लस देत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना ही तक्रारी केली ज्यामुळे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी जितेंद्र  अहिरवार या लस देण्याऱ्या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या लसीकरण मोहिमेअंतर्गत 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील 39 मुले ज्यांचे लसीकरण करण्यात आले होते, हे सर्व विद्यार्थी इयत्ता 9वी ते 12 वीपर्यंतचे होते. पालकांच्या तक्रारीनंतर सागरचे प्रभारी जिल्हाधिकारी  क्षितिज सिंघल यांनी जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ डी के गोस्वामी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

यावेळी पालकांनी अधिकारी गोस्वामी यांनी सांगितले की, लसीकरणकर्त्याने 39 मुलांना लस देण्यासाठी त्याच सुईचा वापर केला होता. दरम्यान पालकांच्या विरोधानंतर आरोपी अहिरवार घटनास्थळावरून फरार झाला, सीएमएचओने शाळेची पाहणी केली असता तो सापडला नाही. आरोपीने सध्या त्याचा फोन बंद केला आहे.  आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे निष्काळजी कृत्य) एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व 39 मुलांची तपासणी केली. सीएमएचओ डॉ. डीके गोस्वामी यांनी सांगितले की, त्यापैकी 19 मुलांचे रिपोर्ट नॉर्मल आढळले असून उर्वरित मुलांचा अहवाल प्रलंबित आहे.


हेही वाचा : चंद्रपूरमधील पूरबाधित घरांना आर्थिक मदत देण्यासह नदीतील अतिक्रमण तत्काळ थांबवा, अजित पवारांच्या सूचना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -