घरदेश-विदेशदिल्ली घेऊ शकणार मोकळा श्वास, पाडणार कृत्रिम पाऊस

दिल्ली घेऊ शकणार मोकळा श्वास, पाडणार कृत्रिम पाऊस

Subscribe

क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यामध्ये चीन देशाचा देखील सहभाग आहे. पण आता चीनने या तंत्राचा वापर प्रदूषण कमी करण्यासाठी करणे सोडून दिले आहे.

दिल्लीत दिवसेंदिवस वाढणारे प्रदुषण चिंतेचा विषय बनले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आता प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी आणखी एक नवी शक्कल लढवण्यात आली आहे. प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी या आठवड्यात दिल्ली परीसरात कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहेत. या पावसामुळे हवेतून विषारी प्रदूषण निघून जाण्यास मदत होऊ शकते. दिल्लीत गेल्या तीन आठवडयांपासून हवामान फारच बिघडले आहे. म्हणूनच हा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

वाचा-दिल्लीत प्रदूषणाचा विळखा; राजपथ परिसर धुरकट

क्लाऊड सीडिंग करुन पाडणार पाऊस

दिल्लीतील हवामान खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वातावरण स्थिर झाल्यानंतर क्लाऊड सीडिंग केले जाणार आहे. जर या आठवड्यात वातावरणात कृत्रिम पावसासाठी अनुकूल बदल दिसले नाहीत तर मग पाऊस पुढच्या आठवड्यात पाडला जाणार आहे.

- Advertisement -

कसे करतात क्लाऊड सीडिंग ?

क्लाऊड सीडिंग करण्यासाठी सिल्व्हर आयोडाईज, ड्राय आईस आणि मीठासारख्या वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. नंतर या पदार्थांना ढगांवर सोडले जाते. त्यामुळे ढगांमध्ये पाणी भरण्यास मदत होते आणि पावसाची शक्यता वाढते. पण त्यासाठी वातावरण अनुकूल असणे गरजेचे असते.

वाचा –न्यायाधिशांनाही सहन होईना दिल्लीचं प्रदूषण!

चीनमध्ये देखील पाडला कृत्रिम पाऊस

क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यामध्ये चीन देशाचा देखील सहभाग आहे. पण आता चीनने या तंत्राचा वापर प्रदूषण कमी करण्यासाठी करणे सोडून दिले आहे. २००९ साली बीजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिकदरम्यान चीनने क्लाऊड सीडिंग पाऊस पडू नये यासाठी केले होते. खेळांमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी हे केले होते. पण त्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी वा अन्य कोणत्याही कारणासाठी चीनमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात आला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -