घरदेश-विदेशसीबीआयमध्ये अंतर्गत वाद होणे हे दुर्दैवी - अरुण जेटली

सीबीआयमध्ये अंतर्गत वाद होणे हे दुर्दैवी – अरुण जेटली

Subscribe

सध्या देशात सुरु असलेल्या सीबीआय प्रकरणावर आता केंद्रमंत्री अरुण जेटली यांनी देखील आपले मत मांडले आहे. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या देशात सुरु असलेल्या सीबीआय प्रकरणावर आता केंद्रमंत्री अरुण जेटली यांनी देखील आपले मत मांडले आहे. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, सीबीआय ही एक प्रीमियर तपास यंत्रणा आहे. त्याची इब्रत वाचवण्यासाठी दोनही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे गरजेचे होते. सीबीआयसारख्या एजंसीमध्ये अंतर्गत वाद होणे हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची चौकशी होणार 

संचालक आणि विशेष संचालकांवर लावलेल्या आरोपांची चौकशी सरकार करू शकत नाही. या प्रकरणी तपास करण्याचे अधिकार हे केंद्रीय सतर्कता आयोगाकडे आहेत, असेही जेटली म्हणाले. आज, बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दोनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे निपक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे.

 

- Advertisement -

विरोधकांनाही सुनावले

विरोधकांना सीबीआय ही काय यंत्रणा आहे, याची माहितीदेखील नसते, असा टोलाही जेटली यांनी सीबीआयला लगावला आहे. सीबीआय प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले. विरोधकांनी मोदी सरकारवर निषाणा साधला आहे. अखेर या सरकारने सीबीआय यंत्रणेलाही खुट्टा लावल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -