घरताज्या घडामोडीपृथ्वीवर एकाचवेळी दिसले ५ 'UFO'

पृथ्वीवर एकाचवेळी दिसले ५ ‘UFO’

Subscribe

पृथ्वीवरील अंतराळामध्ये एकाचवेळी पाच एलियन शिप म्हणजे युएफओ (UFO) पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. धक्कादायकबाब म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन अंटार्टिकावरुन जात होते. त्यादरम्यान इवान टाईमलॅप्स व्हिडीओ बनवत होता. याचवेळी त्याला अरोरा ऑस्ट्रेलिस (पाच अज्ञात लाईट) दिसायला लागली. याचा रशियन अंतराळवीराने व्हिडीओ काढला आहे. तर काही सेकंदांत हे परग्रहवासी यान तेथून गायब झाल्याचा दावा या अंतराळवीराने केला आहे.

कोणी पाहिले हे यान?

रशियन कॉस्मोनॉट इवान वैगनरने हे यान पाहिले असल्याचा दावा केला आहे. रशियामध्ये अंतराळवीराला कॉस्मोनॉट्स म्हटले जाते. जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन अंटार्टिकावरुन जात होते, तेव्हा इवान टाईमलॅप्स व्हिडीओ बनवत होता. याचवेळी त्याला अरोरा ऑस्ट्रेलिस दिसायला लागली. या पाचही लाईट एकमेकांसोबत चालल्या होत्या. पहिल्यांदा दोन, नंतर तीन आणि तीन नंतर चार असे करत पाचही लाईट ५२ सेकंद एकत्र दिसू लागल्या. मात्र, या लाईट ९ ते १२ सेकंदसोबत होत्या. पण, त्यानंतर काही वेळाने पुन्हा या लाईट वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागल्या. या घटनेचा व्हिडीओ इवानने रशियन वैज्ञानिकांकडे तपासणीसाठी पाठविला आहे.

- Advertisement -

इवान यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. सदर्न लाईटशिवाय मी काही वेगळेही पाहिले. या टाईम लॅप्समध्ये काहीतरी वेगळी वस्तू दिसत आहे. तसेच रशियाची अंतराळसंस्था रॉसकॉसमसचे प्रवक्ते व्लादिमीर यूस्तीमेंको यांनी हा व्हिडीओ अद्भूत असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओची तपासणी केली जात आहे.


हेही वाचा – ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला आजपासून सुरुवात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -