घरताज्या घडामोडीViral Video: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी कोविड सेंटरमध्येच धरला ठेका!

Viral Video: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी कोविड सेंटरमध्येच धरला ठेका!

Subscribe

कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात करत आनंद साजरा केलेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात करत आनंद साजरा केलेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका लोकप्रिय अशा भारतीय गाण्यारचा असून कर्नाटकतील एका कोविड केअर सेंटरमधला असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यावर बेधुंदपणे नाचून आनंद व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थाने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे झाल्यानंतर कर्नाटकच्या कोविड केअर सेंटरमध्ये नाचताना दिसत आहेत, असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे.

काय आहे हा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हि़डीओ २० जुलै रोजी शेअर करण्यात आला असून तेव्हापासून हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील बेल्लारी कोविड सेंटरचा आहे. या सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर रुगणांना किती आनंद झाला असावा हे त्यांच्या नृत्यातून समोर आले आहे.

- Advertisement -

हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यापासून व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच या व्हिडीओवर ५०० हून अधिक रिट्विट केला गेला आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत आणि २ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा – Mumbai Coronavirus Daily Update: मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ४३ नवे रुग्ण, तर ४१ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -