घरदेश-विदेशम्यानमारमध्ये भूस्खलन: ५० जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

म्यानमारमध्ये भूस्खलन: ५० जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

Subscribe

या घटनेत अनेक कामगार गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे

कोरोना व्यतिरिक्त विविध आपत्तीमुळे जगभरातील लोकांचा जीव जात आहे. मृत्यूची साखळी थांबताना दिसत नाही. गुरुवारी म्यानमारमधील एका खाणीत दरड कोसळली, त्यात मृतांचा आकडा शेकडोने ओलांडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या मृतांची अद्याप अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान अधिकृत माहितीनुसार, म्यानमारमधील जेड खाणीत दरड कोसळल्यामुळे कमीतकमी ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत अनेक कामगार गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशाच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि माहिती मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी म्यानमारच्या जेड खाणीत दरडी कोसळली. या घटनेत १०० हून अधिक लोक जागीच मरण पावले असल्याचे सांगितले जात आहे. म्यानमारमधील काचीन प्रांतातील या जेड खाणीत मुसळधार पावसामुळे पाणी भरल्यामुळे सकाळी आठच्या सुमारास भूस्खलन झाले आणि दरड कोसळली.

- Advertisement -

या खाणीतील मजूर २५० फूट उंचीवर काम करत असताना हा अपघात झाला. यावेळी जोरदार पावसामुळे खाणीत पाणी भरल्यामुळे अनेक मजूर पाण्यात बुडल्याने मरण पावले आहे. असे सांगितले जात आहे की, खाण कामगार काचीन राज्यातील जेड-समृद्ध हापाकांत भागात दगड गोळा करीत होते, यावेळी ही दरडी कोसळली.

काचीन राज्यात चीनच्या सीमेजवळ मुसळधार पाऊस पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेबाबत म्यानमार अग्निशमन सेवा विभागाने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, खाणीच पावसाने दरड कोसळल्यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे खाण कामगारांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ११३ मृतदेह काढण्यात आले असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या तेथे बचावकार्य सुरू असून जमिनीत गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. संपूर्ण भागाची योग्य देखभाल होत नसल्याने येथे पावसाळ्या दरम्यान दरड कोसळण्याचे प्रकार घडतच असल्याचे सांगितले जात आहे.


लॉकडाऊन पडले महाग, वजन वाढले दोनशे पार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -