घरदेश-विदेशचीनच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप

चीनच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप

Subscribe

संजय राऊतांचा नाव न घेता केंद्रावर आरोप

चीनच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप विरुद्ध काँग्रेस, असं युद्ध पुकारलं जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. गेले काही दिवस काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावरुन आता संजय राऊत यांनी चीनच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्याच प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच, चीनची कोंडी करण्यासाठी व्यापार धोरण ठरवण्याची मागणी केली आहे.

“आपल्याला काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई नको आहे देशात. आपण ती राजकीय लढाई निवडणुकीत लढूया. चीनच्या घुसखोरीचं लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस विरुद्ध भाजप असं युद्ध पुकारलं जातंय. त्यातुन दुर राहिलं पाहिजे. इथून परदेशात गेलेला पैसे परत आणण्याचं आपलं वचन आहे. ते कोणी पूर्ण केलेलं नाही,” असा अप्रत्यक्षपणे टोला पंतप्रधान मोदींना लगावला. परदेशातून पक्षांना, त्यांच्या संघटनांना पैसा येतच आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

चीनची कोंडी करा

आजही भारतात चीनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. आजही मोठ्या प्रमाणात व्यापार सुरु आहे. यासंदर्भात मोदी सरकारने राष्ट्रीय धोरण ठरवलं पाहिजे. चीनसोबत संबंध ठेवायचे आहेत की नाही. ठेवायचे तर कोणत्या स्तरावर ठेवायचे, याबाबत धोरण ठरवावं,” असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – नमो APP वर पण बंदी घाला; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -