घरदेश-विदेशनिकोलच्या टॉयलेटमध्ये सलग दोन दिवस तीच घटना...

निकोलच्या टॉयलेटमध्ये सलग दोन दिवस तीच घटना…

Subscribe

ऑस्ट्रेलियातील एका महिलेच्या घरी सलग दोन दिवस टॉयलेटमध्ये अजगर आढळल्याची घटना घडली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये केर्न्स येथे राहणाऱ्या एका महिलेल्या कामावरून घरी परतल्यानंतर टॉयलेटमध्ये अजगर आढळला. अजगराला पाहताच ती घाबरली. निकोल एरे असे त्या महिलेचे नाव आहे. स्थानिक वृत्तपत्राला घटनेची माहिती देताना निकोल म्हणाली की, “शुक्रवारी कामावरुन परत घरी आल्यानंतर टॉयलेटमध्ये तिला काहीतरी काळ्या रंगाची गोष्ट आढळली.”

निकोल म्हणाली की, “कामावरुन परतल्यानंतर टॉयलेटमध्ये गेले असता टॉयलेटचे लिड उघडे होते. मी टॉयलेटमध्ये पाहिले असता मला काहीतरी काळे दिसले. निरखून पाहिले असता तो अजगर होता. त्याचे केवळ डोकेच बाहेर दिसत होते.”

- Advertisement -

दुसऱ्या दिवशीसुद्धा तीच घटना

क्षणाचाही विलंब न करता निकोलने केर्न्सच्या सर्पमित्रांना पाचारण केले. यावेळी सर्पमित्र डेव्ह वॉल्टन याने अजगराची सुटका केली. पण गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही. दुसऱ्याच दिवशी निकोलच्या घरीच तिच्या बहिणीच्या टॉयलेटमध्ये अजगर आढळला. निकोसने पुन्हा सर्पमित्र डेव्ह वॉल्टनला दूरध्वनी करुन पाचारण केले. या घटनेची माहिती खुद्द डेव्ह वॉल्टनने फेसबुकवर दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -