घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी उद्घाटन कार्यक्रमात...

Ayodhya Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी उद्घाटन कार्यक्रमात होणार सहभागी

Subscribe

अयोध्या : राम मंदिराचा लोकार्पण (Ram Mandir Ayodhya) सोहळा येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात आता भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी हे सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांना 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी यापूर्वीच निमंत्रणपत्रे पाठवण्यात आली होती, मात्र बुधवारी (10 जानेवारी) विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची पुन्हा एकदा भेट घेत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी नेत्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास संमती वर्तविली आहे. (Ayodhya Ram Mandir lal krishna advani Advani and Murali Manohar Joshi will participate in the inauguration program)

हेही वाचा – आमदार अपात्रतेच्या निकालानंतर Uddhav Thackeray यांच्या अडचणीत वाढ! आता ‘मशाल’ चिन्हही जाणार?

- Advertisement -

राममंदिर आंदोलनात सर्वात मोठी भूमिका बजावणारे लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी हे दोन प्रमुख नेते अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचा गैरसमज काही नेत्यांच्या विधानांमुळे निर्माण झाला होता. या दोन्ही प्रकृती चांगली नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या दोन्ही दिग्गज नेत्यांना निमंत्रणपत्रे दिली आणि उद्घाटन कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे स्पष्ट करत फोटो प्रसिद्ध केला होता.

मात्र दोन्ही नेत्यांचे वय लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीचा हवाला देत आणि उदघाटनाच्या कार्यक्रमात मोठा जनसमुदाय, तसेच सुरक्षा लक्षात घेऊन उपस्थित न राहण्याची विनंती केली होती. परंतु विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मनोहर जोशी या दोघांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. तसेच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल. यानंतर दोन्ही नेत्यांनी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi : मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत शिंदे गटाचं मोठं वक्तव्य; …नाहीतर भर चौकात फाशी

राम मंदिर उद्घाटन कार्यक्रम कसा पार पडणार?

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उद्घाट कार्यक्रमाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार असून हा उत्सव सात दिवस चालणार आहे. 22 जानेवारी रोजी होणार्‍या राममंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ची तयारी जोरात सुरू आहे, ज्यात सर्व स्तरातील मान्यवर आणि लोक उपस्थित राहणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 22 जानेवारी रोजी दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लालाला प्रतिष्ठित करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित 22 जानेवारी रोजी रामलल्ला सोहळ्याचे मुख्य विधी पार पाडतील. 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत अमृत महोत्सव साजरा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -