घरदेश-विदेशधनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पतंजलीने लॉन्च केले 'परिधान'

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पतंजलीने लॉन्च केले ‘परिधान’

Subscribe

योगगुरू रामदेव बाबांची पंतजली स्वदेशी कंपनीचे कपड्याच्या पहिल्या शोरुमचे आज उदघाटन करण्यात आले. या वर्षाच्या शेवटी देशभरात २५ शोरुम उघडणार अशी घोषणा रामदेव बाबांनी केली.

योगगुरू रामदेव बाबांची पंतजली स्वदेशी कंपनीचे कपड्याच्या पहिल्या शोरुमचे आज उदघाटन करण्यात आले आहे. दिल्लीत या शोरुमचे उदघाटन करण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून बाजारात पतंजलीच्या जीन्स येणार असल्याची चर्चा होती. अखेर आज या शोरूमचे उदघाटन रामदेव बाबांनी केले. या कपंड्यांना परिधान म्हणून नाव देण्यात आले. या शोरुमध्ये सर्व प्रकारचे कपडे लोकांना उपलब्ध होणार आहेत. या शोरुममध्ये विकल्या जाणारे कपडे हे स्वदेशी असतील. देशातील प्रत्येक राज्यात प्रसिद्ध असलेले कपडेही लोकांना घेता येतील असे बाबांनी सांगितले. या शोरुमच्या उदघाटनाला कुस्तीपटू सुशील कुमार आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर उपस्थित होते. या वर्षाच्या शेवटी देशभरात २५ शोरुम उघडणार अशी घोषणा रामदेव बाबांनी केली.

उदघाटनादरम्यान काय म्हणालेत बाबा

“देशामध्ये आजपासून दिवाळीची सुरुवात झाली आहे. या मुहूर्तावर देशासाठी स्वदेशी कपड्यांचे शोरुमचे उदघाटन करण्यात येत आहे. सामान विकणे हा आमचा उद्देश नाही. या शोरुममध्ये संपूर्ण स्वदेशी कपडे ग्राहकांना मिळणार आहे. या शोरुमच्या माध्यमातून आम्ही एक लाखहून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. या शोरुममध्ये योगासाठी लागणारे कपडेही उपलब्ध आहेत. याठिकाणी पुरुष, स्त्रिया, लहान मुले यासाठी ३ हजार हून अधिक कपड्यांचे प्रकार उपलब्ध आहे.”-  योगगुरू रामदेव बाबा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -