घरदेश-विदेशकर्नाटकातील कराची बेकरी उडवून देण्याची धमकी

कर्नाटकातील कराची बेकरी उडवून देण्याची धमकी

Subscribe

कराची बेकरीच्या मॅनेजरला फोनद्वारे धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कराची बेकरीच्या मॅनेजरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कर्नाटकातील बंगळुरु येथील प्रसिध्द ‘कराची बेकरी’ला बॉम्बने उडवण्याची धकमी देण्यात आली आहे. कराची बेकरीच्या मॅनेजरला फोनद्वारे धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कराची बेकरीच्या मॅनेजरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन विक्की शेट्टी याने हा फोन केला असल्याचे सांगितले जात आहे. विक्की शेट्टीने फोन करुन कराची बेकरीवरील कराची हा शब्द वगळावा अशी मागणी केली आहे. जर कराची शब्द हटवला नाही तर बेकरीला बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. ही धमकी आल्यानंतर बेकरीवरील कराची नाव झाकण्यात आले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी ८ जणांना अटक

कराची बेकरीचे मॅनेजर पी. सुकुमार यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. याघटनेबद्दल असे देखिल सांगितले जात आहे की, फोनवरुन धमकी व्यतिरिक्त कराची बेकरीमध्ये १२- १५ जण घुसून बेकरीच्या मॅनेजरला बेकरीचे नाव हटवण्यात यावे अशी धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याचे असे म्हणणे होते की बेकरीच्या नावासोबत पाकिस्तानातील शहराचे नाव जोडले गेले आहे जे सध्या वादग्रस्त आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना अटक केली आहे.

कराची बेकरीचा पाकिस्तानशी संबंध नाही

कराची बेकरीच्या नावावरुन सुरु झालेल्या वादावरुन वाद सुरु झाला आहे. फाळणीनंतर कराची बेकरी मालक भारतात आले होते. त्यानंतर कराची बेकरी नावाने त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. जे आज एक मोठा ब्रँड म्हणून ओळखला जातो. हैद्राबादमध्ये कराची बेकरीच्या सर्वात जास्त ब्रँच आहेत. दरम्यान, बेकरीने एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, कराची बेकरीचे मालक खानचंद रमनानी फाळणीनंतर कराचीवरुन भारतात आले. कराची बेकरी हा देशभक्ती जपणारा ब्रँड आहे. त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. कराची बेकरीची स्थापना १९५३ साली झाली होती. त्यावेळपासून हे नाव आहे आणि तीच आमची ओळखही झाली आहे. आता ते बदलणं शक्य नाही असं म्हटलं आहे. सगळ्या देशवायीसांच्या भावना आम्ही समजू शकतो असंही कराची बेकरीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

तणावाच्या पार्श्वभूमीवर धमक्या

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. दोन्ही देशामध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवरच कराची बेकरीला धमक्या येत आहेत. कराची बेकरीच्या नावातून कराची हा शब्द हटवण्यात यावा अशी धमकी दिली जात आहे. या धमकीनंतर कराची बेकरीचे नाव झाकण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -