घरअर्थजगतMarch Calendar: सुट्टीपासून मार्च महिन्याची सुरुवात; एकूण 13 दिवस या महिन्यात बँका...

March Calendar: सुट्टीपासून मार्च महिन्याची सुरुवात; एकूण 13 दिवस या महिन्यात बँका असणार बंद

Subscribe

मार्च महिन्याची सुरुवात महाशिवरात्रीपासून होत आहे. यानिमित्ताने देशातील बऱ्याच भागात बँकांना सुट्टी असणार आहे. या महिन्यात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानेही बँकांचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाची काम करायची असेल तर बँकांच्या सुट्ट्याची संपूर्ण यादी पाहूनच घराच्या बाहेर पडायला पाहिजे.

मार्चमध्ये एकूण 13 दिवसांसाठी बँकांचे कामकाज बंद असणार

चालू आर्थिक वर्षाचा मार्च शेवटचा महिना आहे. हा महिना अनेक बाबतीत खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या आणि चौथा शनिवार मिळून वेगवेगळ्या झोनमध्ये बँकांना एकूण 13 दिवसांची सुट्टी असणार आहे. बँकांच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी आरबीआयने जाहीर केली आहे.

- Advertisement -

महाशिवरात्रीला बहुतांश भागात बँकांना सुट्टी

मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी महाशिवरात्री उत्सव आला आहे. यानिमित्ताने उद्या 1 मार्चला अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भोपाल, भुवनेश्वर, चंडीगढ, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्चि, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम झोनमध्ये बँकांचे कामकाज बंद असणार आहे.

याचप्रमाणे लोसार निमित्ताने 3 मार्च 2022ला गंगटोक झोनमध्ये बँका बंद असणार आहेत. तसेच 4 मार्च, 2022ला चपचार कुटच्या निमित्ताने आयझोल झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. 6 मार्च 2022 रोजी रविवार असल्यामुळे सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील. तर 12 मार्चला महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल. तसेच 13 मार्चला रविवार असल्याने या दिवशी सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील.

- Advertisement -

१७ मार्चला होळी असल्यामुळे देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीच्या झोनमध्ये बँकांचे कामकाज बंद असेल. तर १८ मार्चला धुलीवंद / DHuleti / डोवा जत्रा असणार आहे. यानिमित्ताने बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाल, कोच्चि, कोलकाता आणि तिरुवनंतपुरमसोडून इतर सर्व झोनमध्ये बँका बंद राहणार आहेत. तसेच १९ मार्चला होळी / याओसांगचा दुसऱ्या दिवस असल्यामुळे भुवनेश्वर, इंफाल आणि पटनामध्ये बँकांचे काम बंद राहिल.

त्यानंतर २० मार्चला रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. २२ मार्चला बिहार दिवस असल्यामुळे पटना झोनमध्ये बँका बंद राहतील. तर २६ मार्चला महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँकाचे कामकाज बंद राहिल. तसेच २७ मार्चला रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.


हेही वाचा – EPFO: 6.5 कोटींहून जास्त सब्सक्रायबर्सना होळीला मिळू शकते खुशखबर; 12 मार्चला वाढू शकतो व्याजदर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -