घरताज्या घडामोडीमनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नेमणूक

मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नेमणूक

Subscribe

राज्याच्या मुख्य सचिव पदी असलेल्या देवाशिष चक्रवर्ती यांचा कार्यकाळ आज संपुष्टात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे ही मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे देण्यात आली आहेत. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सध्या महाराष्ट्राच्या कॅडरमध्ये सर्वात जेष्ठ आणि अनुभवी अशा मनुकुमार श्रीवास्तव यांच्यावर नावावर केंद्राकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या एप्रिल २०२३ पर्यंत मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे मुख्य सचिव पदाचा भार असणार आहे. मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्याचे मावळते मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार हाती घेतला.

मनुकुमार श्रीवास्तव हे सनदी अधिकाऱ्यांमध्ये सेवा जेष्ठतेनुसार आणि अनुभवानुसार सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी याआधी नागपुरचे पालिका आयुक्तपद, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशी विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या मोठ्या अनुभवानंतरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आगामी सव्वा वर्षे राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे असतील.

- Advertisement -

मनुकुमार श्रीवास्तव यांच्या जोडीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक हे स्पर्धेत होते. पण केंद्राकडून मनुकुमार श्रीवास्तव यांच्या नावाला राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. धुळ्यातील भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांनी उघडकीस काढल्याने ते सुरूवातीच्या काळात चर्चेत आले होते. त्यांच्या सनदी अधिकारी सेवेतील पहिल्याच जबाबदारीत धुळे येथील भ्रष्टाचार प्रकरणाला त्यांनी तोंड फोडले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -