घरदेश-विदेशमध्य प्रदेशमध्ये विचित्र अपघात; बँक मॅनेजरचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये विचित्र अपघात; बँक मॅनेजरचा मृत्यू

Subscribe

मध्य प्रदेशच्या बैतूल शहरात विचित्र अपघात झाला आहे. एका खाणीतून स्फोट झाल्यानंतर त्यातून निघालेला एक दगड महामार्गावर आला आणि एका गाडीच्या छताला फाडून गाडीचालकाला बसला. यामध्ये गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मध्य प्रदेशच्या बैतूल शहरात एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हे गाडीचालक पेशाने बँक मॅनेजर होते. एका खाणीत स्फोट झाला आणि त्यातून उडालेला दगड महामार्गावरुन जाणाऱ्या गाडीवर पडला. त्या दगडाचा वेग इतका होती की गाडीचे छप्पर फाडून तो दगड आत शिरला आणि गाडी चालकाच्या डोक्यावर बसवा. यामध्ये गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, गाडीत आणखी दोन जण होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

अशोक पवार हे होशंगाबाद येथे वास्तव्यास होते. ते सोमवारी दुपारी मुल्ताईच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुपारी एक वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशच्या अल्वी स्टोन क्रशर माईनमध्ये स्फोट झाला. या स्फोटातू बरेच दगड बाहेर पडले. यातील एक दगड महामार्गावर आला आणि अशोक पवार यांच्या गाडीच्या छताला फाडून पवार यांच्या डोक्यावर बसला. यात त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जबर मार बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. बैतूलचे जिल्हाधिकारी तेजस्वी नायक यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिवसा खाणीत कसा स्फोट करण्यात आला याबबात चौकशी होणार आहे. त्याचबरोबर स्टोन क्रशरलाही सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चाकणमध्ये कुख्यात नक्षलवाद्याला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -