घरताज्या घडामोडी'काँग्रेस मुक्त भारत हेच भाजप ममतादीदींचे स्वप्न'- आरएसएसच्या मासिकाचा दावा

‘काँग्रेस मुक्त भारत हेच भाजप ममतादीदींचे स्वप्न’- आरएसएसच्या मासिकाचा दावा

Subscribe

काँग्रेस मुक्त भारत हे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि भाजपाचे स्वप्न आहे असा दावा आरएसएसशी संबंधित स्वस्तिक या बंगाली मासिकात करण्यात आला आहे. यामुळे ममता आणि भाजपामध्ये नेमके काय सुरू आहे यावर आता चर्चा सुरू झाल्या आहे. तर दुसरीकडे भाजप आणि तृणमूल काँग्रेसने मात्र हा दावा निराधार असल्याचे सांगत या लेखाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

मात्र या दाव्यामुळे खडबडून जागे झालेल्या काँग्रेसने आता ममता दिदींचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले आहे. स्वस्तिक हे बंगाली मासिक असून १३ डिसेंबरच्या मासिकात निर्मल मुखोपाध्याय यांनी एक लेख लिहला आहे. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी इतिहास पुसत आहेत का? असा सवाल केला आहे. यासाठी त्यांनी ममता दीदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचा हवाला दिला आहे. तसेच ममता यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी की सोनियांना उद्धवस्त करण्यासाठी हे सगळ सुरू केलं असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

- Advertisement -

ममता यांच्यात बदल झाला असून त्या पूर्वीच्या ममता बॅनर्जी नाहीत. तर नरेंद्र मोदींच्या काँग्रेसमुक्त स्वप्नावर या ममतांचा विश्वास बसला आहे. त्यांना इतिहास पुसायचा आहे. त्या शत्रूंना प्रतिस्पर्ध्यांना जवळ आणत असल्याचेही या लेखात म्हटले आहे.

दरम्यान या मासिकाचे संपादक टिळक रंजन बेरा यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी हा लेख निराधार असल्याचे म्हटले आहे. तर तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनीही हा दावा निराधार असल्याचे सांगत भाजपच्या आरोपाचे खंडन केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -