घरदेश-विदेशBengaluru Cafe Blast : आरोपीने मशिदीत बदलले कपडे?; एनआयएकडून संशयिताची छायाचित्रे जारी

Bengaluru Cafe Blast : आरोपीने मशिदीत बदलले कपडे?; एनआयएकडून संशयिताची छायाचित्रे जारी

Subscribe

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी स्फोट झाला होता. याप्रकरणी आता एनआयएने स्फोटातील संशयिताची छायाचित्रे जारी करून बक्षीस जाहीर केले आहे. तसेच संशयिताचे बस आणि कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत. (Bengaluru Cafe Blast Accused changed clothes at mosque NIA releases photographs of suspect)

हेही वाचा – CNG Rate In Pune: पुणेकरांना दिलासा! CNG च्या दरांत मोठी घसरण

- Advertisement -

एनआयएने सांगितले की, रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवणारा संशयित सकाळी 10.45 वाजता सिटी बसमधून कॅफेजवळील बसस्टॉपवर उतरला. रामेश्वर कॅफे बस स्टॉपपासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे. यावेळी त्याने त्याठिकाणी फेऱ्या मारून 11.34 वाजता कॅफेमध्ये प्रवेश केला आणि 8 मिनिटांनंतर कॅफेमधून बाहेर पडला. त्यानंतर संशयिताने एक किलोमीटर अंतरावरील बसस्थानकावर जाऊन बस पकडली आणि पळून गेला. एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, संशयिताने बसस्थानकावर जाण्याआधी एका मशिदीजवळ थांबला. त्याठिकाणी त्याने आपले कपडे बदलले आणि टोपी फेकून दिली. एनआयएने संशयिताची टोपी जप्त केली आहे.

- Advertisement -

एनआयएने कॅफेमध्ये प्रवेश करताना टोपी, मास्क आणि चष्मा घातलेल्या संशयित हल्लेखोराचे छायाचित्र पोस्ट केले आहेत. संशयिताच्या खांद्यावर बॅग आहे आणि त्याने काळी पँट, राखाडी रंगाचा शर्ट, काळे बुट, क्रीम रंगाची टोपी आणइ चष्मा लावला आहे. एनआयएने संशयिताची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही म्हटले आहे.

हेही वाचा – Shivsena MLA Disqualification: नार्वेकरांच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; मूळ रेकॉर्ड्स मागवले

काय आहे प्रकरण?

रामेश्वर कॅफेध्ये 1 मार्च रोजी स्फोट झाला होता. ज्यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी स्फोटानंतर लगेचच कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीला बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) मुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -